fbpx
Jul 9, 2019
593 Views
1 2

आजची विक्रम-वेताळाची गोष्ट – ८६

Written by

मिरची, मसाले हे माणसांच्या दैनंदिन आहारातील महत्वाचे घटक आहेत व सातत्याने यांची मागणी वाढत आहे. मसाला क्षेत्रात खुप मोठी संधी आहे व ग्रामीण भागात छोटे उद्योग उभे रहावे यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी व ताठ मानेनं जगू पाहणाऱ्या स्त्रीला आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘ग्रामीण भागातील महिलांसाठी मसाला पल्वलायझर योजना’ सुरू केली आहे. महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत सर्वसाधारण महिलांसाठी व शासन निधीतून दारिद्रय रेषेखालील महिलांना व्यवसायासाठी मसाला पल्वलायझर मशीन वाटप योजना राबविण्यात येते.

Share This
 •  
 • 303
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  303
  Shares

आज पुन्हा राजा विक्रमादित्य झाडाजवळ गेला, प्रेत उतरवून त्याने खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे चालू लागला. तेव्हां प्रेतात लपलेला वेताळ म्हणाला, राजा तुझे कष्ट पाहून मला तुझी दया येते. तू इतके सारे का सोसतो आहेस हेच मला कळत नाही. तुझे कष्ट कमी होण्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगतो, त्याने तुझे मनोरंजनही होईल

राजा ही गोष्ट आहे धुळे जिल्ह्याच्या सिंदखेड तालूक्यातील अलाने गावच्या दिपालीबाई चंद्रासिंग गिरासे यांची. दिपालीबाई गिरासेचे बारावी पर्यंत शिक्षण झाले. दिपालीबाई शाळेत असल्या पासून स्वाभिमानी, अन्याय सहन करणारी, पण दिपालीबाईच्या नशिबी भुरट्या चोर्‍या करणारा दारूडा नवरा आला. सासूसासर्‍यांनी हात टेकले तर जात पंचायतीत तक्रार केली तर आज सुधारेलउद्या सुधारेल असे म्हणून प्रत्येक वेळी तिची बोळवण केली जात होती. जात पंचाईतीत का तक्रार करते म्हणून दिपालीबाईचा नवरा मारत असे. एक दिवस पुन्हा जात पंचायतीने सबुरीचा सल्ला दिला त्यावर ती पंचांना उलटसुलट बोलली आणि सोडचिठ्ठी हिस्सा मागून मोकळी झाली. अर्धी शेती तिला मिळाली, दोन मुले घेऊन ती वेगळी राहू लागली पण गंमत म्हणजे सासूसासरे तिच्याकडेच राहायला आले. तीन एकर शेतीत ती राबत होती पण म्हणावे तसे उत्पन्न होत नव्हते. कोणाच्या तरी सांगण्यावरून तिने शेतात मिरच्या लावल्या पण त्याचाही भाव पडला त्यामुळे तिने त्या बाजारात पाठवल्या नाहीत. गावातल्या मारवाड्याच्या दुकानात ती साखर्‍या आणायला गेली तेंव्हा एका गिर्‍हाईकाला शेठ २०० ग्रामचं मिरची पावडरचं पाकिट ६० रुपायाला देत होता. त्यावर ती शेठला बोलली, काय शेठ, किती लुटणार लोकांना? आम्ही मिरच्या ६० रुपये किलोनं विकतो आणि तुम्ही पिसलेली २०० ग्राम मिरची ६० रुपायाला विकता? त्यावर शेठने पाकिटावरची छापील किंमतच दाखवली. दिपालीबाई साखर्‍या घेऊन घरी आली खरी पण तिचे मन काही थार्‍यावर नव्हते. २०० ग्रामला ६० रुपये म्हणजे ३०० रुपये किलो६० रुपये किलोअसेच काही ती विचार करत होती. घरात पडलेली मिरच्यांची पोती पाहून आपण स्वत: जर मिरची पावडर करून विकली तर आपल्याला नफा चौपटपाचपट मिळेल असा विचार तिच्या मनात आला

दिपालीबाईनं मिरची पावडरला लागणार्‍या यंत्रांची माहिती मिळवली. छोट्या मसाला पल्वलायझर मशिनची किंमत ७० हजाराच्या आसपास होती. वजनासाठी, पॅकिंगसाठी लागणारं साहित्य आणि यंत्राची किंमत वेगळी. मशिनसाठी लागणार्‍या मोठ्या भांडवलाचे काय करायचे हा प्रश्न होता. घरातील किडुकमिडुक विकून काही पैसे जमा होतील पण वरचे पैसे कोण देणार? मशिनसाठी लागणार्‍या भांडवलाचे काय करायचे या विचाराने तिला काही सुचत नव्हते

सांग राजन, काय करायचे दिपालीबाई गिरासेनं? कुठून आणायचे एवढं भांडवल

राजन, माझ्या प्रश्नाचे उत्तर माहित असूनदेखील तू मौन राहिलास तर तुझ्या डोक्याचे अनेक शकलं होतील हे लक्षात ठेव, वेताळ गंभीरपणे म्हणाला

राजा विक्रमादित्याने क्षणभर विचार केला म्हणाला… 

वेताळा, दिपालीबाई गिरासे हीची व्यथा ऐकून वाईट वाटले. दिपालीबाईची अडचण आहे पण त्यावर उत्तरही आहे

पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही उद्योग, व्यवसाय उभारण्याची क्षमता असते. ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करण्याच्या हेतुने, त्याच प्रमाणे ग्रामीण महिलांनाही विविध उद्योगांची माहिती संधी मिळावी यासाठी शासन सतत प्रयत्न करीत असते

मिरची, मसाले हे माणसांच्या दैनंदिन आहारातील महत्वाचे घटक आहेत सातत्याने यांची मागणी वाढत आहे. मसाला क्षेत्रात खुप मोठी संधी आहे ग्रामीण भागात छोटे उद्योग उभे रहावे यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी ताठ मानेनं जगू पाहणाऱ्या स्त्रीला आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेग्रामीण भागातील महिलांसाठी मसाला पल्वलायझर योजनासुरू केली आहे. महिला बालकल्याण विभाग अंतर्गत सर्वसाधारण महिलांसाठी शासन निधीतून दारिद्रय रेषेखालील महिलांना व्यवसायासाठी मसाला पल्वलायझर मशीन वाटप योजना राबविण्यात येते. लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा यासाठी ग्रामसेवक अथवा तलाठी यांचा वार्षिक उत्पन्न दाखला आवश्यक आहे. विधवा, परितक्ता, निराधार महिलांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देण्यात यावा असे निर्देश आहेत. एकूण प्रकल्पाच्या १०% स्वहिस्सा देण्याची आवश्यकता असते. लाभार्थीकडे स्वत:ची जागा विद्युत पुरवठा असणे आवश्यक आहे

दिपालीबाई गिरासेनं महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी मसाला पल्वलायझर योजनेची मदत घ्यावी आणि आपली अडचण सोडवावी असे म्हणत राजा विक्रमादित्याने आपले बोलणे थांबवले.  

राजा, खरं तर मला या गोष्टीशी काहीही घेणेदेणे नाही, मला फक्त तुला बोलते करायचे होते. तुझ्या उत्तरामुळे माझे समाधान झाले खरे पण तु मौनव्रत सोडलेस, आता मला जावे लागेल. असे म्हणून वेताळ मोठमोठ्याने हसत प्रेतासह गायब झाला आणि पुन्हा झाडावर लोंबकळू लागला

चंद्रदेव कुंभार

Share This
 •  
 • 303
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  303
  Shares

Leave a Reply

MENU