fbpx
Aug 13, 2019
286 Views
0 0

आजची विक्रम वेताळाची गोष्ट 90

Written by

मागेल त्याला शेततळे योजनेतून अहमदनगर जिल्ह्यात साडे नऊ हजार शेततळी पूर्ण झाली व त्यामाध्यमातून १८ हजार टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. या पाणीसाठ्यातून ३६ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन करण्याची सोय झाली आहे असे म्हणत राजा विक्रमादित्य बोलायचा थांबला.

Share This
 •  
 • 259
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  259
  Shares

राजा विक्रमादित्य झाडाजवळ गेला, प्रेत उतरवून त्याने खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे चालू लागला. तेव्हा वेताळाने विचारले, “राजन, तु शासनाच्या एवढ्या योजना सांगतोस पण त्या योजनांचा फायदा कोणाला झाला आहे का?”

राजा विक्रमादित्याने क्षणभर विचार केला म्हणाला

अहमदनगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातील राजुरी पासून १५ किमी अंतरावर बाभळेश्वर या गावातील गणपत नारायण भोसले यांची गोष्ट. गणपत भोसले यांच्याकडे नऊ एकर शेती आहे त्यात ते स्वत: आणि त्यांची दोन मुले कष्ट करतात. विहिर होती पण पाणी कमी असल्यामुळे उत्पादनही मर्यादित होते. अहमदनगर जिल्ह्यातील अल्प पर्जन्यमानामुळे फेब्रुवारी पासून मे महिन्‍यापर्यंत पाण्‍याची तीव्र टंचाई असते. शेतीपूरक व्‍यवसाय म्‍हणून भोसले यांनी दुग्‍धव्‍यवसायाला पसंती दिली आठ गायींचे संगोपन करतात पण जनावरांच्या चाऱ्याचा फार मोठा प्रश्‍न होता.

गणपत भोसलेंनी महाराष्ट्र शासनाच्यामागेल त्याला शेततळे योजनाया  संबंधी ऐकले त्याचा लाभ घेण्याचे ठरवले. भोसले यांनी आपल्या शेतात ३०x३० मीटर आकाराचे शेततळे बांधले. पावसाळ्यात शेततळे भरले आता ते शेतात शेवगा, मका, डाळींब, ऊस यासह चारा पिके घेतात. उन्हाळी कांद्याचीही लागवड करतात. शेततळ्यातील पाण्यामुळे एप्रिल मे या पाणी टंचाईच्या स्थितीत सुद्धा जनावरांना हिरवा चारा मिळतो. हिरव्या चार्‍यामुळे दुध उत्‍पादनात वाढ झाली त्यापासून जवळपास ८० लीटर दूधाचे उत्‍पादन मिळते

शेततळे योजनेमुळे शेतीतील उत्पादनात दुप्पटीने वाढ झाली आणि याचा परिणाम म्हणून भोसले कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न १० लाखांपर्यंत पोहोचले.

मागेल त्याला शेततळे योजनेतून अहमदनगर जिल्ह्यात साडे नऊ हजार शेततळी पूर्ण झाली त्यामाध्यमातून १८ हजार टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. या पाणीसाठ्यातून ३६ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन करण्याची सोय झाली आहे असे म्हणत राजा विक्रमादित्य बोलायचा थांबला

राजा, खरं तर मला या गोष्टीशी काही देणेघेणे नाही, मला फक्त तुला बोलते करायचे होते. तुझ्या उत्तरामुळे माझे समाधान झाले पण तु मौन सोडलेस, आता मला जावे लागेल. असे म्हणून वेताळ मोठमोठ्याने हसत प्रेतासह गायब झाला आणि पुन्हा झाडावर लोंबकळू लागला.

Share This
 •  
 • 259
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  259
  Shares
Article Categories:
Uncategorized

Leave a Reply

MENU