fbpx
Mar 12, 2019
942 Views
13 2

आजची विक्रम-वेताळाची गोष्ट – ७४

Written by

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या बीज भांडवल योजनेचा लाभ अमरसिंग राठोडने घ्यावा व आपल्या हक्काच्या ऑटो रिक्षाचे स्वप्न पूर्ण करावे असे म्हणत राजा विक्रमादित्याने आपले बोलणे थांबवले.

Share This
 •  
 • 288
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  288
  Shares

आज पुन्हा राजा विक्रमादित्य झाडाजवळ गेला, प्रेत उतरवून त्याने खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे चालू लागला. तेव्हां प्रेतात लपलेला वेताळ म्हणाला, राजा तुझे कष्ट पाहून मला तुझी दया येते. तू इतके सारे का सोसतो आहेस हेच मला कळत नाही. तुझे कष्ट कमी होण्यासाठी मी तुला एक गोष्ट सांगतो, त्याने तुझे मनोरंजनही होईल

राजा आजची गोष्ट आहे वर्ध्याच्या अमरसिंग भिमसिंग राठोड याची. अमरसिंग त्याच्या आईवडिलांचे आयुष्य कायम भटकंतीत गेले. सुरुवातीला ऊस तोडणीसाठी कधी सांगली जिल्ह्यात तर कधी कोल्हापूर जिल्ह्यात असे फिरत असत. ऊस तोडणीचे काम हे वर्षभर नसे त्यामुळे दारात गरीबी कायम उभी होती. एकदा ऊस तोडणी करताना अमरसिंगच्या वडिलांना साप चावला आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. आई आशादेवी १२ वर्षाच्या अमरसिंगला घेऊन गावी आली. आशादेवीने गवंड्याच्या हाताखाली घमेली उचलायची कामे करुन अमरसिंगला लहानाचे मोठे केले. अनेक वर्षांपासून अमरसिंग सुध्दा आईसोबत काम करुन घर चालवायला मदत करत असे. एके दिवशी कामावर त्याचे मुकादमाबरोबर भांडण झाले आणि मुकादमाने मायलेकाला कामावरून काढून टाकले. अमरसिंग या अपमानास्पद बिगारी कामाला कंटाळला होता त्याने यापुढे बिगारी काम करायचे नाही असे म्हणत आईला घेऊन त्याने बांधकामाची साईट सोडली

अमरसिंग एका मित्राच्या मदतीने ऑटो रिक्षा चालवायला शिकला आणि शिफ्टवर रिक्षा भाड्याने घेऊन चालवू लागला. दिवसभर धंदा करूनही शिफ्टचे भाडे देऊन हातात फारसे शिल्लक राहात नव्हते. आजची ६० रुपयांची कमाई आईच्या हातात देताना तो म्हणालामाय, आज इतनाच पैसा मिलस्नं, शिफ्टनं भाडं जाके कुछ बचत नाइस्नं.” त्यावर त्याची आई सहज बोलून गेली की तु तुझी रिक्षा का घेत नाहीस? अमरसिंगला सुध्दा वाटले की खरच किती दिवस आपण भाड्याची रिक्षा चालवायची? आपली स्वत:ची रिक्षा का नाही? रिक्षा घेण्यासाठी अडीच लाख रुपये लागतील आपल्याला एवढी मोठी रक्कम कोण देणार? आपल्याकडे तर काहीच शिल्लक नाही. रात्री जेवण झाल्यावर तो अंथरूणावर पडला पण डोक्यातील स्वत:च्या मालकीच्या रिक्षाच्या विचारामुळे त्याला झोप येत नव्हती

सांग राजन, काय करायचे अमरसिंगने? कुठून आणायचे पैसे? अमरसिंग राठोडचं स्वप्न पूर्ण होणार नाही का?

राजन, माझ्या प्रश्नाचे उत्तर माहित असूनदेखील तू मौन राहिलास तर तुझ्या डोक्याचे अनेक शकलं होतील हे लक्षात ठेव, वेताळ गंभीरपणे म्हणाला

राजा विक्रमादित्याने क्षणभर विचार केला म्हणाला… 

वेताळा, अमरसिंग राठोड सारख्या तरूणांची व्यथा ऐकली पण त्यावर उत्तरही आहे.  

भारतात अनेक कष्टकरी लोक आहेत पण दुर्दैवाने त्यांनाच गरीबीशी झुंजावे लागले. कष्टकरी, प्रामाणीक आणि आत्मसन्मान जपणार्‍या लोकांना मदत करण्याच्या प्रयत्न महाराष्ट्र शासन सातत्याने करत असते आणि त्यासाठी अनेक योजना राबवत आहे. भटक्या आणि विमुक्त जातीजमाती या सातत्याने फिरतीवर असल्यामुळे त्यांचा म्हणावा तसा विकास होऊ शकला नाही. पिढयानपिढया आपले बिहाड घेऊन भटकंती करणाया समाजाच्या आर्थिक, सामाजिक शैक्षणिक असा सर्वांगीण विकास करण्याकरीता शासनाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या नावाने वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाची स्थापना केली आहे. विमुक्त जाती भटक्या जमातीच्या, आर्थिकदृष्टया दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना राष्ट्रीय मागासवर्ग विकास महामंडळाच्या सहकार्याने अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. महामंडळाच्या वतीने  ‘बीज भांडवल कर्ज योजनासुरू करण्यात आली आहे या योजनेत ७५% बँकेचा सहभाग आणि २५% महामंडळाचा सहभाग असतो. बीज भांडवल कर्ज योजनेत स्वतःचा सहभाग काहीही नसून महामंडळाचा सहभागास % ते % व्याजदर आकारण्यात येतो

वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाच्या बीज भांडवल योजनेचा लाभ अमरसिंग राठोडने घ्यावा आपल्या हक्काच्या ऑटो रिक्षाचे स्वप्न पूर्ण करावे असे म्हणत राजा विक्रमादित्याने आपले बोलणे थांबवले

राजा, खरं तर मला या गोष्टीशी काहीही घेणेदेणे नाही, मला फक्त तुला बोलते करायचे होते. तुझ्या उत्तरामुळे माझे समाधान झाले खरे पण तु मौनव्रत सोडलेस, आता मला जावे लागेल. असे म्हणून वेताळ मोठमोठ्याने हसत प्रेतासह गायब झाला आणि पुन्हा झाडावर लोंबकळू लागला

चंद्रदेव कुंभार

Share This
 •  
 • 288
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  288
  Shares

Leave a Reply

MENU