fbpx
Sep 10, 2019
441 Views
2 1

उन्नती शेती समृद्ध शेतकरी योजना

Written by

हळदीचे पीक नगदी असले तरी त्यासाठी मोठे कष्ट लागतात. पीक काढल्यानंतर हळद शिजवणे, वाळवणे व ढोल करणे या पारंपारिक प्रक्रिया अत्यंत किचकट, वेळखाऊ, कष्टाच्या, खर्चिक व धोकादायक आहेत. याला पर्याय म्हणून हळदीचा कुकर वापरण्यात येतो. कुकरमुळे मजूर, इंधन यावरील खर्च कमी होऊन वेळ आणि पाणीदेखील कमी लागते. सुरक्षितरित्या हळद शिजवता येते व हळदीची प्रत चांगली रहाते. हळद कुकरची किंमत ४ ते ५ लाख रुपये असल्याने प्रत्येकास कुकर घेणे परवडत नाही.

Share This
 •  
 • 300
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  300
  Shares

महाराष्ट्राची यशोगाथा: उन्नती शेती समृद्ध शेतकरी योजनाहळद प्रक्रिया उद्योगातून सुधीर जाधव बनले सुधीरशेठ

राजा विक्रमादित्य झाडाजवळ गेला, प्रेत उतरवून त्याने खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे चालू लागला. तेव्हा वेताळाने विचारले, “राजन, तु शासनाच्या एवढ्या योजना सांगतोस पण त्या योजनांचा फायदा कोणाला झाला आहे का?”

राजा विक्रमादित्याने क्षणभर विचार केला म्हणाला…   

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालूक्यातील जुनुना या छोट्याशा गावातील सुधीर साहेबराव जाधव यांची गोष्ट. सुधीर जाधव यांचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले परंतू नोकरीसाठी गाव सोडावे लागणार आणि १२ वी पासवाल्याला नोकरी काय मिळते, पगार किती मिळतो हे त्यांच्या मित्रांच्या अनुभवाने जाणून होते. नोकरी करण्यापेक्षा आपला परंपरागत शेती व्यवसाय करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांची एकर शेती असून त्यात ते हळद, कापूस आणि सोयाबीन इत्यादीचे उत्पादन घेतात. शेतीला जोडधंद्याची साथ लाभल्यास शेती तोट्यात जात नाही हा मंत्र सुधीर जाधव जाणून होते

हळदीचे पीक नगदी असले तरी त्यासाठी मोठे कष्ट लागतात. पीक काढल्यानंतर हळद शिजवणे, वाळवणे ढोल करणे या पारंपारिक प्रक्रिया अत्यंत किचकट, वेळखाऊ, कष्टाच्या, खर्चिक धोकादायक आहेत. याला पर्याय म्हणून हळदीचा कुकर वापरण्यात येतो. कुकरमुळे मजूर, इंधन यावरील खर्च कमी होऊन वेळ आणि पाणीदेखील कमी लागते. सुरक्षितरित्या हळद शिजवता येते हळदीची प्रत चांगली रहाते. हळद कुकरची किंमत ते लाख रुपये असल्याने प्रत्येकास कुकर घेणे परवडत नाही. सुधीर जाधव यांनी ही बाब हेरून शेतीला जोडधंदा म्हणून कुकरद्वारे हळद शिजविण्याच्या उद्योगाची निवड केली. पण हे सगळे जरी खरं असलं तरी हळद कुकरला लागणारे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न होताच

सुधीर जाधवांना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवल्या जाणार्‍या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम याची माहिती मिळाली. हिंगोलीच्या जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधून मार्गदर्शन घेतले पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत युनियन बँक ऑफ इंडियाकडे कर्जप्रस्ताव सादर केला. सुधीर जाधवांना लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत लाख ३७ हजार ५०० रुपयांचे अनुदानही मिळाले. हळद शिजविण्याच्या कुकर खरेदी करुन आपला हळद प्रक्रिया उद्योग सुरु केला. व्यवसाय सुरु केल्याने हळद उत्पादन करणारे शेतकरी जाधव यांच्याकडे आपली हळद शिजविण्यासाठी येऊ लागल्याने त्यांच्या उद्योगास गती प्राप्त झाली. आता सुधीर जाधव यांची या व्यवसायातून सुमारे लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल होत आहे त्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडही केली असे म्हणत राजा विक्रमादित्य बोलायचा थांबला.

राजा, खरं तर मला या गोष्टीशी काही देणेघेणे नाही, मला फक्त तुला बोलते करायचे होते. तुझ्या उत्तरामुळे माझे समाधान झाले पण तु मौन सोडलेस, आता मला जावे लागेल. असे म्हणून वेताळ मोठमोठ्याने हसत प्रेतासह गायब झाला आणि पुन्हा झाडावर लोंबकळू लागला.

Share This
 •  
 • 300
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  300
  Shares
Article Tags:
·

Leave a Reply

MENU