fbpx
Sep 3, 2019
642 Views
2 2

उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेमुळे विश्वनाथ मलवार ट्रॅक्टरचे मालक झाले

Written by

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या जांभोरा येथील विश्वनाथ गंगाराम मलवार यांची ही गोष्ट. विश्वनाथ मलवार यांच्याकडे दोन हेक्टर शेती असून ते पारंपारिक पद्धतीने शेती करत होते. मजुरीपोटी लाखो रूपये द्यावे लागायचे. शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर भाड्याने आणून काम करावे लागायचे. अनेकवेळा ट्रॅक्टर न मिळाल्यामुळे त्यांचे शेतीची कामे वेळेवर होत नसत त्यामुळे शेत मशागतीची वेळ निघून जायची आणि त्यांचा पिकावर परिणाम व्हायचा. या सर्व परिस्थितीमुळे आपला स्वत:चा ट्रॅक्टर असावा असा विचार त्यांच्या डोक्यात आला पण ट्रॅक्टरसाठी एवढे भांडवल कुठून आणायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

Share This
 •  
 • 1.1K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1.1K
  Shares

राजा विक्रमादित्य झाडाजवळ गेला, प्रेत उतरवून त्याने खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे चालू लागला. तेव्हा वेताळाने विचारले, “राजन, तु शासनाच्या एवढ्या योजना सांगतोस पण त्या योजनांचा फायदा कोणाला झाला आहे का?”

राजा विक्रमादित्याने क्षणभर विचार केला म्हणाला…   

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्याच्या जांभोरा येथील विश्वनाथ गंगाराम मलवार यांची ही गोष्ट. विश्वनाथ मलवार यांच्याकडे दोन हेक्टर शेती असून ते पारंपारिक पद्धतीने शेती करत होते. मजुरीपोटी लाखो रूपये द्यावे लागायचे. शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर भाड्याने आणून काम करावे लागायचे. अनेकवेळा ट्रॅक्टर मिळाल्यामुळे त्यांचे शेतीची कामे वेळेवर होत नसत त्यामुळे शेत मशागतीची वेळ निघून जायची आणि त्यांचा पिकावर परिणाम व्हायचा. या सर्व परिस्थितीमुळे आपला स्वत:चा ट्रॅक्टर असावा असा विचार त्यांच्या डोक्यात आला पण ट्रॅक्टरसाठी एवढे भांडवल कुठून आणायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अशाच अनेक शेतकर्‍यांच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजना सुरू केली. या अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण करण्यात येत आहे शेतकऱ्यांना यंत्रसामुग्री किंमतीच्या ३५ ते ५० टक्के अनुदान देण्यात येते. विश्वनाथ मलवार यांनी उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजनेचा लाभ घेवून ३५% अनुदानावर जॉन डियर कंपनीचा 45HP क्षमतेचा ट्रॅक्टर घेतला. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना  लाख २५ हजार रूपये अनुदान मिळाले. शासनाने दिलेल्या अनुदानामुळे विश्वनाथ मलवार ट्रॅक्टरचे मालक झाले. ट्रॅक्टर आल्याने शेतीच्या कामांची गती वाढली आहे. खोलवर जमिनीची चांगली मशागत होत असल्याने उत्पादनात फरक दिसून आला आहे. इतरांना देखील भाड्याने ट्रॅक्टर देतात त्यातून अधिकचे उत्पन्नही मिळते. शेतमाल बाजारात वेळेत पोहोचविणे शक्य होत आहे. इतरांवर अवलंबून रहाणे कमी झाल्याने शेतीचे नियोजनही सोपे झाले आहे असे म्हणत राजा विक्रमादित्य बोलायचा थांबला.

राजा, खरं तर मला या गोष्टीशी काही देणेघेणे नाही, मला फक्त तुला बोलते करायचे होते. तुझ्या उत्तरामुळे माझे समाधान झाले पण तु मौन सोडलेस, आता मला जावे लागेल. असे म्हणून वेताळ मोठमोठ्याने हसत प्रेतासह गायब झाला आणि पुन्हा झाडावर लोंबकळू लागला

Share This
 •  
 • 1.1K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1.1K
  Shares

Leave a Reply

MENU