fbpx
Feb 16, 2019
815 Views
10 0

“एन्ड गेम” ची सुरुवात

Written by

भारतीय राजकारणाचे दोन महत्त्वाचे टप्पे जर आपण मांडायचे ठरवले तर नरसिंह राव यांच्या आधीचा आणि नंतरचा असे मांडणे जास्त योग्य ठरेल.त्याचे एकमेव कारण म्हणजे आर्थिक सुधारणा. काँग्रेसच्या घातक समाजवादी पायाच्या आर्थिक धोरणांमुळे कमकुवत झालेली अर्थव्यवस्था नरसिंह राव यांनी मनमोहन सिंग यांच्या मदतीने मार्गी आणली. पण नंतर देशाला खऱ्या अर्थाने स्थिर सरकार कधीच मिळाले नव्हते. सहानुभूतीच्या प्रचंड लाटेवर १९८५ साली राजीव गांधी जिंकले त्यानंतर २०१४ साली नरेंद्र मोदी. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने २८२ जागा जिंकून इतिहास घडवला.स्थिर सरकारचे राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक फायदे असतात. त्यांचा शक्य तितका जास्तीत जास्त फायदा घेऊन मोदींनी राज्य केले. सरकारचे आता शेवटचे दोन महिने शिल्लक आहेत. 

सेंट्रल हॉलमधील पहिल्या भाषणात नरेंद्र मोदींनी म्हटले होते “मैं साडेचार साल राज करूंगा आखरी छह महिने राजनीती करूंगा.”जसे बोलले तसेच ते करत आहेत 

डिसेंबर २०१८ मधील विधानसभा निवडणुकांमध्ये तीन राज्ये भाजपच्या हातातून गेली आणि त्यानंतर देशभरात वातावरण पुर्णपणे बदलत आहेत असे चित्र रंगविण्यास सुरुवात झाली.विरोधी पक्षांना साहजिकच जोर चढला. पक्षांच्या आघाड्या,गठबंधन वगैरे वगैरे चर्चा सुरु झाल्या.तिसरी आघाडीच्या नेतृत्वासाठी जो उठेल तो नेता दावा करू लागला. तिकडे राहुल गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.भाजप हतबल झाला आहे, नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता झपाट्याने खाली येत आहे असे चित्र नेहमीच विरोधात असलेली मीडिया आणि जोशात आलेली सोशल मीडिया रंगवू लागली. 

अशा परिस्थितीत नवीन वर्ष उजाडले आणि पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी एन्ड गेमला सुरुवात केली.

“एएनआय” या वृत्तसंस्थेला मुलाखत देऊन ज्या प्रश्नांची उत्तरे लोकांना हवी होती ती व्यवस्थित मुद्देसूदरित्या देऊन टाकली. 

संसदेमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेलच्या मुद्द्यावर ज्या आरोपांची खोटी राळ उठवली गेली त्या सर्व आरोपांच्या अक्षरशः चिंध्या उडवून टाकल्या. तुमच्या लक्षात आले असेल राफेलचा मुद्दा साफ मागे पडला आहे.

आर्थिक मागासांना आरक्षण मिळावे अशी एक मागणी गेली कित्येक वर्ष केली जात आहे.जानेवारीच्या मध्यास मोदी यांनी आर्थिक दुर्बलांना १०% टक्के आरक्षण मिळवून देणारी घटनादुरुस्ती केली. 

रामजन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून चालढकल होत असतानाच केंद्र सरकारने परिसरातील वादग्रस्त नसलेली जमीन न्यासाला परत करण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला.

जानेवारीच्या शेवटच्या दिवशी दुबईतून हिंदी चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणातील दोन महत्त्वाच्या साक्षीदारांना अक्षरशः उचलून भारतात आणले.त्याचा परिणाम असा झाला की गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना अटकपूर्व जामिनासाठी धाव घ्यावी लागली. सध्या त्यांची ईडीमार्फत चौकशी चालू आहे. 

१ फेब्रुवारीच्या अंतरिम बजेटमध्ये प्रथा धुडकावून इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये बदल केले. कनिष्ठ मध्यम वर्गीयां ना थेट तर उच्च मध्यमवर्गीयांना अप्रत्यक्ष फायदा करून दिला.

नऊ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून परदेशी पलायन केलेला विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटन सरकारच्या गृहखात्याने मंजुरी दिली असून ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.

सारडा चीटफंड घोटाळ्यामध्ये कोलकात्याचे पोलीस कमिशनर राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी सीबीआयच्या टीमलाच अटक करून ममता बॅनर्जी यांनी एक अत्यंत घातक पायंडा पाडला आहे. पश्चिम बंगाल हा जणू काही एक स्वतंत्र देश आहे मी त्याची हुकुमशाह पंतप्रधान आहे अशा थाटात त्यांचे वावरणे सुरू आहे. त्यांना पाठिंबा द्यायला सर्व विरोधी पक्ष तत्परतेने सरसावले आहेत यात कोणतेही नवल नाही.

अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात उपोषणाचा घाट घातला. परंतु त्यांच्या उपोषणाला सर्व लोक कंटाळले आहेत. मुख्य म्हणजे यावेळी गेल्यावेळेसारखी सरकारविरोधात नाराजी नाही. म्हणून त्यांना बिलकूल प्रतिसाद मिळाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्थी करून ते उपोषण मागे घेण्यास अण्णांना भाग पाडले. 

या आहेत मोदी यांनी सुरू केलेल्या एन्ड गेमच्या काही चाली.लोकसभा निवडणुकीची अधिसूचना यायला अजून एक महिना बाकी आहे. राजकारणात सात दिवस हा खूप मोठा काळ आहे असे म्हणतात. तेव्हा येत्या महिन्यात कोणत्या चाली खेळल्या जातील याबद्दल अनेक जण आजच्या घडीला अनभिज्ञ आहेत.

गेली लोकसभा निवडणूक सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे भाजपने जिंकली अशी एक वदंता आहे.सोशल मीडियावर प्रभावीरित्या प्रचार केल्यामुळे भाजपला प्रत्यक्ष किती वाढीव मतदान वाढले हे मोजण्याचे काहीही प्रमाण नाही. सोशल मीडियावर परसेप्शनचे बॅटल असते. भाजप ते हरत आहे असाही काही लोकांनी समज करून द्यायला सुरुवात केली होती. गेल्या दोन महिन्यात अनेक ग्रुप कार्यरत झाले आहेत. फेसबुक पेजेस सुरू झाली आहेत. सरकारच्या कामगिरीचे मेसेजेस सगळीकडे फिरत आहेत.सरकारविरोधी पद्धशीरपणे पसरवण्यात येणाऱ्या खोट्या बातम्यांचे ताबडतोब खंडन करून दलाल पत्रकारांचे बुरखे फाडले जात आहेत.

In chess and chess-like games, the endgame(or end game or ending) is the stage of the game when few pieces are left on the board. The line between middlegame and endgameis often not clear, and may occur gradually or with the quick exchange of a few pairs of pieces.

वरच्या व्याख्येत मिडल आणि एन्ड गेममधील पुसट रेषा हळूहळू स्पष्ट होते किंवा काही चाली अचानक खेळल्या जातात.

भारतीय राजकारणात मोदींनी ही रेषा स्पष्ट करत तर नेली आहेच पण आता इंतजार आहे अशा दोन तीन धक्कादायक खेळींचा ज्यामुळे वातावरण पूर्णपणे बदलून जाईल .

मोदी हे धोका पत्करणारे राजकारणी आहेत 

जनतेची नस जाणणारे राजकारणी आहेत

राष्ट्र प्रथम या मंत्राने काम करणारे राजकारणी आहेत

पण ते राजकाणी आहेत हे कधीही विसरू नका. ते राजकारण करणारच.

शेवटच्या महिन्यांमध्ये ते असे काही निर्णय घेतील की विरोधकांच्या तंबूत पळापळ सुरू होईल.देशाचे वातावरण निर्णायकरित्या भाजपाच्या बाजूने ते वळवतील.

The endgame has already begun.

– आनंद विश्वनाथ

Share This
 •  
 • 35
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  35
  Shares

Leave a Reply

MENU