fbpx
Aug 22, 2019
658 Views
4 1

कोहिनूर मशहूर है

Written by

राजकीय सूडबुद्धीने या नोटीस पाठवल्या गेल्या आहेत असे मनसेचे म्हणणे आहे. आणि त्याला मोदी विरोधक मीडिया एकमुखाने दुजोरा देत आहे.अशाच प्रकारच्या भावना मोदीविरोधक सोशल मीडियावरही व्यक्त करत आहेत.काही जण तर टोकाला जाऊन यामागे युतीचे अंतर्गत राजकारण आहे असेही म्हणत आहेत.

Share This
 •  
 • 378
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  378
  Shares

सध्या देशाचे वातावरण एका वेगळ्या विषयामुळे तापले आहे. राजकारण्यांना पाठवण्यात येणाऱ्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या नोटिसेस हा तो विषय.भारताचे माजी अर्थ/गृहमंत्री पी. चिदंबरम याचे प्रकरण अगदी ताजेच आहे.महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेश आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांना ईडीने नोटीसेस पाठवल्या आहेत.त्यामुळे खूप मोठा गदारोळ उठला आहे.विशेषतः राज यांना नोटीस बजावली आहे म्हणून.आज हजर होण्यास सांगितले आहे.

राजकीय सूडबुद्धीने या नोटीस पाठवल्या गेल्या आहेत असे मनसेचे म्हणणे आहे. आणि त्याला मोदी विरोधक मीडिया एकमुखाने दुजोरा देत आहे.अशाच प्रकारच्या भावना मोदीविरोधक सोशल मीडियावरही व्यक्त करत आहेत.काही जण तर टोकाला जाऊन यामागे युतीचे अंतर्गत राजकारण आहे असेही म्हणत आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी दहा सभा घेऊन मोदी सरकारवर तुफान टीका केली होती. त्याचा बदला म्हणून मोदी सरकार राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवून छळत आहे असे त्यांचे सर्वसाधारणपणे म्हणणे आहे.या चौकशीचा राजकीय अन्वयार्थ काय ? खरोखरच राजकीय सूड आहे का ? कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होणार ? यामध्ये पडता  खरी परिस्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊ..

इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फिनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ( IL&FS) ही वित्तीय क्षेत्रातील एक मोठी कंपनी आहे.या कंपनीच्या कारभारात फार मोठे घोटाळे झाले आहेत. ज्या ज्या कोणाचे या कंपनीशी व्यवहार होते त्यापैकी अनेकांना ईडीने चौकशी साठी बोलावले आहे आणि भविष्यात बोलावतील. राज ठाकरे यांना अशाच एका व्यवहारासंबंधी नोटीस आली आहे.

दादर पश्चिमेला असलेली कोहिनूर मिल विकत घेण्याचा सौदा काही वर्षांपूर्वी झाला.४२१ कोटी रुपयांच्या हा सौदा करण्यासाठी कोहिनूर डेव्हलपर्स ग्रुपचे उन्मेश जोशी, मातोश्री ग्रुपचे राज ठाकरे आणि राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी राजन शिरोडकर या तिघांनीकोहिनूर सिटीएनएलया नावाची  एक जॉईंट व्हेंचर कंपनी स्थापन केली.IL&FS ने सुरवातीला यासाठी २२५ कोटी रुपयांचे कर्ज दिले.

काही दिवसांनंतर म्हणजे २००८ साली IL&FS ने  कंपनीने सगळे कर्ज फक्त ९० कोटी रुपयांत सेटल करून टाकले.याचा दुसरा अर्थ कंपनीने १३५ कोटी रुपयांचा मोठा तोटा सहन केला.

सर्वसाधारणपणे ज्यावेळी व्यवहारात एकाला तोटा होतो त्यावेळी दुसऱ्याला फायदा होत असतो.जर IL&FS ला तोटा झाला तर फायदा कोणाला झाला

नेमके यानंतर काही दिवसांतच राज ठाकरे यांनी कोहिनूर सिटीएनएल आपला हिस्सा विकून टाकला आणि ते बाजूला झाले.इथपर्यंतच राज यांचा संबंध या प्रकरणात आहे. वरील सर्व गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये आहेत. कोणत्याही प्रकारचा कल्पनाविलास नाहीये.

या १३५ कोटी रुपयांचा तोटा सहन करण्याच्या व्यवहारात काही पैशांची अवैध अफरातफर (मनी लॉंडरिंग) आहे की नाही किंवा ते कर्ज देताना अशा काय त्रुटी होत्या ज्यामुळे IL&FS ला कर्जरकमेच्या ६०% तोटा सहन करावा लागला.कारण ६०% तोटा ज्यालाहेअर कटअसे म्हणतात हे परसेंटेज खूप मोठे आहे

राज बाजूला झाल्यानंतर सुद्धा या कंपनीने वित्तपुरवठा करणे थांबवले नाही. ऐकून केलेला वित्तपुरवठा ८६० कोटी रुपये इतका आहे.

हे प्रकरण २००८ चे आहे मग नेमके विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर का बाहेर आले

IL&FS या कंपनीत मोठे घोटाळे झाले असावेत असे  गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये उघडकीस आले.कंपनीवर तब्बल ९१००० कोटी रुपयांची कर्जे आहेत. कंपनी ने दिलेल्या कर्जांपैकी किती वसूल होतील याबाबत शंका आहे. कंपनीच्या  व्यवहारांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैशांची अफरातफर झाली आहे असा संशय आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्यावर्षाअखेर दिलेल्या रिपोर्टमध्ये या कंपनीविरुद्ध कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. कंपनीने दिलेल्या कर्जांपैकी किती कर्जे बुडीत आहेत याची खरी माहिती ताळेबंदात दिली नाही असा गंभीर आरोप या कंपनीवर आहे. कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करून केंद्र सरकारने कारभार ताब्यात घेतला आहे. डायरेक्टर्स, ऑडिटर्स,वरिष्ठ कर्मचारी आणि कंपनींकडून कर्ज घेतलेले सर्वजण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

ईडीने या कंपनीविरुद्ध पहिली चार्जशीट फक्त दिवसांपूर्वी म्हणजे  १७ ऑगस्टला   फाईल केली आहे आणि कंपनीच्या ५७० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

कर्ज जरी जुने असले तरीप्रकरणनवे आहे इतकेच लक्षात असूदे.उन्मेश जोशी आणि राज ठाकरे या दोघांना ईडीने जे समन्स बजावले आहे ते या कंपनीचा गैरव्यवहारातून उद्भवलेल्या चौकशीच्या अनुषंगाने आहे यामध्ये कोणतेही राजकारण नाही.अशी चौकशी सगळ्यांची होत आहे.

जर कोणताही गैरव्यवहार केला नसेल तर कुणालाही घाबरून जायचे कारण नाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया अगदी योग्य आहे.

माझ्या मते राज यांचा या प्रकरणाशी संबंध खूप मर्यादित स्वरूपाचा आहे. गैरव्यवहार नसेल तर त्यांना काहीही होणार नाही. ते सहीसलामत बाहेर पडतील.परंतु या चौकशीचा राजकीय इशू जर करण्यात आला तर मात्र त्याची परिमाणे वेगळी असतील,परिणाम वेगळे असतील.राज यांना त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होण्याची शक्यता आहे.

पन्नास वर्षांपूर्वी विविध भारतीवर याच कोहिनूर मिल्सचा एक रेडिओ प्रोग्राम विविधभारती वर लागायचा. त्याच्या जिंगलची थीम आज आठवली

कोहिनूर मशहूर है..

आनंद विश्वनाथन

Share This
 •  
 • 378
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  378
  Shares

Leave a Reply

MENU