fbpx
Aug 27, 2019
132 Views
0 0

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळे वाघ यांच्या शेतीला संजिवनी

Written by

पंडित वाघ यांनी तलावातील २०५ ट्रॅक्टर गाळ त्यांच्या शेतात टाकला व खडकाळ जमिनीला गाळयुक्त शिवार करून बागायती केली. त्यांनी शेतात भेंडी, तूर, कापूस पिकांची लागवड केली व उत्पादनात मोठी वाढ झाली.

Share This
 •  
 • 4
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  4
  Shares

महाराष्ट्राची यशोगाथा: गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळे वाघ यांच्या शेतीला संजिवनी… 

राजा विक्रमादित्य झाडाजवळ गेला, प्रेत उतरवून त्याने खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे चालू लागला. तेव्हा वेताळाने विचारले, “राजन, तु शासनाच्या एवढ्या योजना सांगतोस पण त्या योजनांचा फायदा कोणाला झाला आहे का?”

राजा विक्रमादित्याने क्षणभर विचार केला म्हणाला…   

औरंगाबाद पासून २० कि.मी अंतरावर असलेल्या चौका येथील शेतकरी पंडित कारभारी वाघ यांची ही गोष्ट. पंडित वाघ वनमजूर आहेत मुलगा सुभाष याच्यासह त्यांचे सात जणांचे कुटुंब आहे. चौका गावापासून पाच किलोमीटरवर डोंगराच्या पायथ्याशी त्यांची खडकाळ शेत जमीन होती पण कितीही कष्ट केले तरी त्यातुन फारसे उत्पन्न मिळत नसे. पाण्याच्या सोईसाठी गावातील शेतकऱ्यांनी तलावाची निर्मिती केली. याचा शेतीला जसा फायदा झाला तसा डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे शेतीतील माती पावसाच्या पाण्याने वाहून जायची आणि तलावात पाण्याबरोबरच गाळही साचायचा

महाराष्ट्रात सुमारे ८५ हजार जलाशये असताना आणि धरणांसाठी वारेमाप खर्च करूनही पावसावर अवलंबून राहण्याची वेळ या राज्यावर आली होती. वर्षभरात झालेल्या पावसापैकी अंदाजे ८० टक्के पाणी आणि त्यासोबत भूपृष्ठावरील मातीदेखील वाहून जाते. धरणे, जलसाठे यामध्ये वर्षानुवर्षे साठत चाललेल्या गाळामुळे त्यांच्या साठवण क्षमतेत मोठ्याप्रमाणात घट होत आहे. यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीगाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनासुरू केली. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतामध्ये स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास शेतकरी तयार झाले. गाळ उपसून तो शेतात टाकल्याने धरणेतलावातील पाण्याचा साठा वाढला.

पंडित वाघ यांनी तलावातील २०५ ट्रॅक्टर गाळ त्यांच्या शेतात टाकला खडकाळ जमिनीला गाळयुक्त शिवार करून बागायती केली. त्यांनी शेतात भेंडी, तूर, कापूस पिकांची लागवड केली उत्पादनात मोठी वाढ झाली. नेहमी जेवढ्या प्रमाणात रासायनिक खत वापरावे लागायचे तेवढी गरज भासली नाही आणि उत्पन्नही वाढले ही किमया गाळाने केली असे म्हणत राजा विक्रमादित्य बोलायचा थांबला

राजा, खरं तर मला या गोष्टीशी काही देणेघेणे नाही, मला फक्त तुला बोलते करायचे होते. तुझ्या उत्तरामुळे माझे समाधान झाले पण तु मौन सोडलेस, आता मला जावे लागेल. असे म्हणून वेताळ मोठमोठ्याने हसत प्रेतासह गायब झाला आणि पुन्हा झाडावर लोंबकळू लागला.

Share This
 •  
 • 4
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  4
  Shares

Leave a Reply

MENU