fbpx
Aug 9, 2019
342 Views
0 0

गाळातून प्रगतीकडे…

Written by

शासनाने आणलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेचा लाभ उठवावयाचे गावातील शेतकऱ्यांनी ठरविले. त्यांच्या मदतीला शासनाचा जलसंधारण विभाग आणि स्वयंसेवी संस्था आली. त्यांच्या सहकार्यातून शेतकऱ्यांनी या तलावातील गाळ आपल्या शेतात नेला.

Share This
 •  
 • 284
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  284
  Shares

डोंगराच्या पायथ्याशी असलेली त्यांची जमीन खडकाऴच होती. त्यात पावसाळ्यात तर साफ धुतलीच जायची. आता या अशा जमिनीवर उगवणार ते किती आणि मिळणार ते किती? घरात खाणारी तोंड सात. सगळेच शेतीवर अवलंबून. अगदी एखादाच वन मजूर. गावात एक तलाव होता. पण त्यातील पाणीसाठा जेमतेमच. गावकऱ्यांनीच मिळून हा तलाव बांधला होता. पण नऊ एकरातील या तलावात साठलेल्या गाळाने पाणीच पिऊन टाकलेयावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना गावकऱ्यांसाठी देवदूतासारखी धावून आली.

महाराष्ट्र शासनाची गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरली आहे. या योजनेचाच लाभ औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील शेतकऱ्यांनी घेतला. अगदी औरंगाबादपासून २० कि.मी अंतरावर असलेल्या चौका येथील शेतकरी सुभाष पंडित वाघ आणि त्यांचे वडिल पंडित कारभारी वाघ यांनी शेजारच्या तलावातील गाळ आपल्या शेतात टाकून उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. त्यांचीच ही यशोगाथा

राज्यात देशातील सर्वाधिक धरणे, जलसाठे आहेत. या धरणांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होते. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुन:र्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ देखील होते,याचेच उत्तम उदाहरण म्हणजे चौका येथील वाघ कुटुंबाची शेती. प्रारंभीच उल्लेख केल्याप्रमाणे चौका गावापासून पाचसहा किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराच्या पायथ्याची जमीन अगदी खडकाळ होती. तिचा पोत सुधारावा, उत्पन्न चांगले मिळावे, या उद्देशाने तेथील वाघ कुटुंबाने गाळयुक्त शिवार योजनेचा लाभ घेतला. चौका येथील शेतकऱ्यांसाठी ही योजना तर फलदायीच ठरली, हे येथील डोंगरपायथ्याशी येऊन पाहिल्यासच अनुभवयास येते.

शासनाने आणलेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेचा लाभ उठवावयाचे गावातील शेतकऱ्यांनी ठरविले. त्यांच्या मदतीला शासनाचा जलसंधारण विभाग आणि स्वयंसेवी संस्था आली. त्यांच्या सहकार्यातून शेतकऱ्यांनी या तलावातील गाळ आपल्या शेतात नेला.

पंडित वाघ आणि सुभाष वाघ यांनी  बाजूच्या तलावातील २०५ ट्रॅक्टर गाळ त्यांनी आपल्य़ा शेतात टाकला. त्यामुळे खताची आवश्यकताही  कमी झाली. फवारणी करत असलेले सुभाष वाघ म्हणतात, तलावाचा मोठा फायदा झाला. त्याचबरोबर गाळाचा. त्यामुळे भेंडी, कापूस, तूर उत्पादनात मोठी वाढ झाली. पिके जोमाने डोलायला लागली. वाघ यांनी संपूर्ण  शेतात गाळ टाकला नाही. पण त्यामुऴे झाले असे की या गाळाचा नेमका फायदा काय ते त्यांना बघायला मिळाले. शेताच्या ज्या भागात त्यांनी गाळ टाकला नाही, तिथे तुरळक उत्पादन झाले

मात्र,जिथे गाळ टाकला तेथील उत्पादन मात्र भरगच्च स्वरूपात पाहायला मिळाले. ही किमया अर्थातच या गाळानेच केली.

गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या शेतामध्ये स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास आम्ही तयार झालो. त्यामुळेच या योजनेचा लाभ आम्हाला मिळाला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ झाला. स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यातून आणि जलसंधारण विभागाच्या पुढाकाराने हा लाभ आमच्या पदरी पडला आणि तो आमच्या फायद्याचाच ठरला. केवळ तलावातील गाळ उपसून आम्ही तो आमच्या शेतात टाकल्याने तलावातील पाण्याची खोलीही वाढली. त्यामुळे तलावात आजही पाणी खेळते आहे. परिसरातील विहिरींनाही भरपूर पाणी आहे. त्याचा शेती उत्पादनाला मोठा फायदा होतो. खडकाळ जमिनीला आम्ही गाळयुक्त शिवार करून बागायती केली आहे. त्याचा उत्पादन वाढीसाठी फायदा होतो आहे. हे केवळ आणि केवळ शक्य झाले ते शासनाच्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळेच, असेही पंडित वाघ आत्मविश्वासाने सांगतात.

या झालेल्या बदलामुळे आज त्यांनी शेतात भेंडी, तूर, कापूस पिकांची लागवड केली आहे. पाण्याची काहीशी कमतरता असतानाही आज पिके तग धरून आहेत, ती केवळ शेतात टाकलेल्या गाळामुळेच. शिवाय रासायनिक खतांचा वापरही कमी झाल्याने खर्चातही कपात झाली. उत्पादनही जोमाने येत आहे. गाळयुक्त शिवारामुळे माझ्या शेतीला नवसंजिवनी मिळाली आहे. यामुळे शासनाचा खऱ्या अर्थाने मी लाभार्थी असल्याचेही पंडित वाघ म्हणतात

राज्यातील अनेक गावांमध्ये अशा यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील. अर्थात हे यश सरकारी योजनांचं आणि त्याच्या अंमलबजावणीच आहे. हे अमान्य करून कसे चालेल

सर्चशास्त्री

Share This
 •  
 • 284
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  284
  Shares
Article Categories:
KOMB

Leave a Reply

MENU