fbpx
Aug 30, 2019
561 Views
1 0

चला दुष्काळ इतिहासजमा करूया

Written by

जायकवाडी वगळता अन्य सर्व धरणांमध्ये असणारा उणे चिन्हातील पाणीसाठा, १ हजार २९८ टँकरद्वारे पिण्यासाठी पाणी पुरवले जात असल्याने भविष्यात जर टंचाईवर मात करायची असेल तर सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी नव्याने खणण्याचा कार्यक्रम मराठवाड्यात हाती घेण्याची नितांत गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात ६०० विहिरी खोदण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Share This
 •  
 • 488
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  488
  Shares

महिनाभरापूर्वी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने कहर केलारायगड , रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्या्च्या काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना महापूराने विळखा घातला. राज्यात एकीकडे जनता महापूराच्या संकटातून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करीत होती त्याचवेळी मराठवाड्यातील जनता मात्र आकाशाकडे बघत येरे येरे पावसाचा धावा करीत होती. राज्य सरकार या दोन्ही परस्परविरोधी परिस्थितीशी लढताना दिसत आहे

मराठवाड्यातील वर्षानुवर्ष सुरु असलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी केला आहेदुष्काळ दूर करण्यासाठी सरकार पावलं उचलत असून मराठवाड्यातील दुष्काळ पुढची पिढी पाहणार नाही. मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ असेल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जनतेला दिला आहे. मुख्यमंत्री केवळ घोषणा करून थांबलेले नाही. तर त्यांनी दोन मोठ्या योजनाही हाती घेतल्या आहेत.  

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असला तरी मराठवाड्यातील पाणीटंचाई अजूनही हटलेली नाही. या वर्षी झालेला कमी पाऊस लक्षात घेता टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ६०० विहिरी म्हणजे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत चार हजार ८०० विहिरी फक्त पाणीपुरवठ्यासाठी म्हणून पहिल्यांदाच खणल्या जाणार आहेत.    

जायकवाडी वगळता अन्य सर्व धरणांमध्ये असणारा उणे चिन्हातील पाणीसाठा, हजार २९८ टँकरद्वारे पिण्यासाठी पाणी पुरवले जात असल्याने भविष्यात जर टंचाईवर मात करायची असेल तर सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी नव्याने खणण्याचा कार्यक्रम मराठवाड्यात हाती घेण्याची नितांत गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात ६०० विहिरी खोदण्याचा निर्णय शासनाने घेतला आहेबहुतांश विहिरी धरणांच्या बुडीत क्षेत्रात किंवा अस्तित्वात असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या जवळपास घेतल्या जाव्यात, असे निर्देश शासनाने दिले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी खणल्या जाणाऱ्या दोन विहिरींमध्ये ५०० मीटरचे अंतर असावे, अशी सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. वाडीवस्तीवरील लोकसंख्येला किमान ४० लिटर पाणी द्याायचे असेल तर नवीन विहिरी घेणे आवश्यक आहे

विहिरींसारख्या उपायांबरोबरच सरकारने मराठवाडा जलसंजाल ही अनोखी योजना हाती घेण्याचे ठरविले असून त्यासाठी चार हजार कोटींची पहिली निविदाही जारी करण्यात येत आहे. योजनेचं नाव वाचून फारसाकाही अर्थबोध होत नाही असं तुमच म्हणणं असू शकतं. तरमग बघुया काय आहे ही योजना…    

कोकणातील लहानमोठ्या सुमारे ३० नदी खोऱ्यातील वाया जाणारे ११५ अब्ज घनफूट पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळिवण्याचा अत्यंत महत्वाकांशी प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. . त्यासंबंधीचे सर्वेक्षण अन्वेषण करण्याचा आदेश जलसंपदा विभागाने जारी केले आहेत.. एका नदी खोऱ्यातून दुसऱ्या नदीच्या  खोऱ्यात  पाणी नेण्याचा राज्यातील हा पहिलाच मोठा प्रकल्प असून, त्यासाठी सुमारे ६० ते ७० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हायला साधारणपणे पाच ते सहा वर्षे लागतील असा अंदाज आहे.

गेल्या काही वर्षात मराठवाड्याला सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड द्याावे लागत आहे. राज्याच्या भौगोलिक रचनेत दहा टक्के भाग असलेल्या कोकणात ६० टक्के पाऊस पडतो. मात्र कोकणातील पाणी फार थोड्या प्रमाणात अडवले जाते मोठ्या प्रमाणावर पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते. त्याचा शेतीसाठी किंवा पिण्यासाठी फारसा उपयोग होत नाही. मराठवाड्यात पाणी नाही आणि कोकणात पाणी वाया जाते. अशा परिस्थितीत कोकणातील पाणी मराठवाडण्यात नेता येईल कायाचा विचार करण्यात येऊन त्याच्या सर्वेक्षणाचे आदेश सरकारने जलसंपदा विभागाला दिले आहेत

उत्तर कोकणातील नारपार, दमणगंगा, वैतरणा उल्हास नदी खोऱ्यात ३७० अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी शिल्लक आहे. त्यापैकी ११५ अब्ज घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याची तरतूद एकात्मिक जलआराखड्यात करण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील निर्णयानुसार आंतरराज्यीय दमणगंगापिंजाळ राज्यांतर्गत नारपारगोदावरी, दमणगंगावैतरणा दमणगंगाएकदरेगोदावरी इत्यादी नदीजोड प्रकल्प राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहेत. हे प्रकल्प प्रामुख्याने मराठवाड्यातील तुटीच्या खोऱ्यातील भागासाठी असतील. यामुळे येत्या पाचसहा वर्षांत मराठवाड्यातील चित्र निश्चितच बदलेलं असेल.

सर्चशास्त्री

Share This
 •  
 • 488
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  488
  Shares
Article Categories:
KOMB

Leave a Reply

MENU