fbpx
Aug 11, 2019
384 Views
0 0

चलो जलाये दीप वहाँ…

Written by

मुंबई पासून केवळ १३० किलोमीटर दूर असलेले रायगड जिल्ह्यातील तुंगी नावाचे असे एक गाव आहे जिथे ह्या अभियानात पहिल्यांदा वीज मिळाली. आजवर पीठ दळून आणण्यासाठी त्यांना शेजारच्या गावात म्हणजे सुमारे ७ किलोमीटर दूर चालत जावे लागे. आज गावातच ती सोय शक्य झाली.

Share This
 •  
 • 461
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  461
  Shares

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशभर गावोगाव वीज पोहोचवली; जिथे आजवर वीज पोहोचली नव्हती त्या गावांत प्रगतीसाठी उर्जा आली. ह्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्रातील अशा १११ गावांत पहिल्यांदाच वीज पोहोचली आहे. ज्या गरीबांच्या घरात आजवर विजेची जोडणी नव्हती अशा घरांतही वीज पोहोचवण्याची योजना केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात वेगाने हाती घेतली. महाराष्ट्रातही त्याच कार्यक्रमाच्या अंतर्गत सुमारे साडेसहा लाख गरिबांच्या घरात पहिल्यांदा वीज पोहोचली. अनेक वर्षांचा साचलेला अंधार दूर झाला

भारत सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना ह्या योजने अंतर्गत देशभर ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम राबवण्यात आला. २०११ च्या जणगणनेच्या प्रमाणे महाराष्ट्रात एकंदर गावांची संख्या ४०,९५६ गावे आहेत. सदर योजनेच्या आकड्यांनुसार ३० जून २०१९ पर्यंत सर्व गावात वीज पोहोचवण्यात आली. महाराष्ट्रात ग्रामीण भागात एकंदर ,४५,८१,६६७ इतकी घरे आहेत. ३० जून २०१९ सर्व घरात वीज जोडणी देण्यात आली आहे. ऑक्टोबर २०१७ पर्यंत सुमारे १० लाख घरांत वीज जोडणी देण्याचे काम शिल्लक होते. गेल्या दीडपावणे दोन वर्षांत तेही काम पूर्ण झाले असून वीज जोडणी नाही असे एकही घर ग्रामीण महाराष्ट्रात शिल्लक नाही.

२०११ च्या जणगणनेच्या प्रमाणे महाराष्ट्रातील शहरी भागातील घरांची संख्या आहे ९९,७८,७३९ त्यापैकी सुमारे लाख घरांत ऑक्टोबर २०१७ पर्यंत वीज पोहोचली नव्हती. गेल्या दीडपावणे दोन वर्षांत ते कामही पूर्ण करण्यात आले असून शहरी भागातील सर्व घरात वीज पोहोचली आहे. त्यातही फेब्रुवारी २०१९ पासून म्हणजे गेल्या पाच महिन्यांत विशेष वेगाने प्रयत्न करत शेवटच्या सुमारे ८२,००० घरांच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता महाराष्ट्रातील सर्व गावांत सर्व घरात वीज जोडणी देण्याचे काम पूर्ण झाले आहे

तुंगी गावात घरात वीज पोहोचली

मुंबई पासून केवळ १३० किलोमीटर दूर असलेले रायगड जिल्ह्यातील तुंगी नावाचे असे एक गाव आहे जिथे ह्या अभियानात पहिल्यांदा वीज मिळाली. आजवर पीठ दळून आणण्यासाठी त्यांना शेजारच्या गावात म्हणजे सुमारे किलोमीटर दूर चालत जावे लागे. आज गावातच ती सोय शक्य झाली. अनेकांच्या कडे मोबाईल फोन होते पण किलोमीटर जाऊन शेजारच्या गावात सकाळी जायचे आणि फोन चार्ज करून आणायचा असा क्रम होता. वीज आल्याने ह्या सगळ्या दगदगीपासून गावकऱ्यांची सुटका झाली आहे. हीच गोष्ट सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोनगाव नावाच्या गावाची. बहुतांश घरे शेतमजुरांची. बहुतांश दारिद्र्य रेषेच्या खालची. इथल्या ६५ घरांना पहिल्यांदाच वीज मिळाली आहे.

अशीच गोष्ट आहे मुंबईपासून जेमतेम समुद्री मैल अंतरावर असलेल्या घारापुरी किंवा एलिफंटा बेटाची. केवळ ते बेट असल्यामुळे तिथे वीज पोहोचली नव्हती. घारापुरी येथील लेणी ही जगप्रसिद्ध. युनेस्कोने जागतिक ठेवा म्हणून जाहीर केलेली. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ भरपूर. वीज मिळावी म्हणून गेली २६ वर्षे तेथील रहिवासी मागणी करत होते. झगडत होते. अखेर गेल्यावर्षी समुद्रातून केबल टाकून घारापुरी गावाला वीज पुरवठा करण्यात आला. सुमारे १२०० लोकवस्तीचे हे छोटेसे बेट. पण रोजची पर्यटकांची वर्दळ २५००. पर्यटकांच्या साठी अनेक उपहारगृह घारापुरी बेटावर आहेत. आजवर स्वत:चे जनरेटर लावून कसेबसे काम सुरु ठेवत असत. जनरेटरसाठी लागणारे इंधन बोटीवरून घेऊन यायचे. त्यात पेट्रोलडीझेल कॅनमधून नेण्यास बंदी! मग बाबापुता ते चिरीमिरी वगैरे मार्गाने ते आणून छोटा जनरेटर चालवायचा. ह्या सगळ्या कटकटीतून सर्वांचीच सुटका झाली आहे. नोटबंदी नंतर क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड चा वापर वाढला. पण विजेच्या अभावी तिथे ह्या सुविधा चालणार कशा? तेथे छोटेसोव्हेनीर शॉपचालवणाऱ्या तरुणाच्या मते आता ह्या सुविधा इथे सुरु होतील. बँक शाखा काढतील, एटीएम येईल, निवासासाठी हॉटेल सुरु करता येईल

एखाद्या गावात वीज येते म्हणजे नेमके काय होते? नेमका काय फरक पडतो ह्याची कल्पना विजेचा वापर सरावाचा झालेल्या कोणाला करता येईलच असे नाही. म्हणून दोन गावांत वीज आल्याच्या हकिगती थोड्या विस्ताराने दिल्या आहेत

गावात वीज येणे म्हणजे साचलेपण दूर होणे…     

गावात वीज येणे म्हणजे प्रगतीचा मार्ग सापडणे…   

हिरण्य सूर्यवंशी

Share This
 •  
 • 461
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  461
  Shares

Leave a Reply

MENU