fbpx
Feb 25, 2019
375 Views
16 1

जनधन

Written by

नरेंद्र मोदी यांनी निवडून आल्यावर पहिल्याच वर्षी त्यांनी घोषित केलेली जनधन अकाउंट उघडण्याची योजना ही अत्यंत चांगली योजना होती. त्यामुळे ज्यांनी आजवर काही ना काही कारणाने बँकेचे तोंड बघितले नव्हते अशा अगदी गरीब माणसांना बँकेत खाते उघडता आले. त्यामुळे विविध सरकारी योजनांचे मिळणारे पैसे, अन्य ठिकाणहून मिळणारे पैसे, मनरेगा, शिष्यवृत्ती, सबसिडी वगैरेचे पैसे मिळणे कोणा मध्यस्ताच्या मर्जीवर राहिले नाही. सगळी रोकड हातात असल्यावर आलेले सर्वच पैसे खर्च व्हायचे. खात्यात गेल्यावर काहीतरी रक्कम तिथे ठेवण्याची अनेकांना सवय लागली. जरी अमुक रक्कम ठेवावी अशी सक्ती नसली तरी. अल्प उत्पन्न गटांच्या साठी असणाऱ्या अपघात विमा व जीवनविमा आदि अल्पदरात मिळणाऱ्या योजना घेणे अकाउंट असल्यामुळे सोपे झाले. असे ३२ कोटी ६८ लाख अकाउंट उघडले गेले ही मोठी गोष्ट आहे. जरी त्या खात्यात ‘झीरो बॅलन्स’ असला तरी चालण्यासारखे होते तरीही त्या खात्यात ८० हजार कोटींच्या पेक्षा अधिक रक्कम आहे. नोटबंदी नंतर भरणा झालेले सुमारे ४० हजार कोटी रुपये वजा केले तरी तितकेच म्हणजे ४०-४५ हजार कोटी रुपये लोकांनी त्या खात्यात ठेवले होते. ही देखील विशेष गोष्ट आहे.

Share This
 •  
 • 2
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  2
  Shares
Article Tags:
· ·

Leave a Reply

MENU