fbpx
Sep 21, 2019
609 Views
2 3

थांबायचं नाय आता…थांबायचं नाय

Written by

जलयुक्त शिवार, शेततळी व विहिरी बांधण्याबरोबरच राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून तब्बल १५ हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीतून आगामी तीन वर्षात ५२ पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचे ‘लक्ष्य’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निश्चित केले आहे.

Share This
 •  
 • 1.6K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1.6K
  Shares

निवडणुकांची घोषणा आता कोणत्याही क्षणी होईल. प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यादृष्टीने तयारीही सुरु केली आहे. राज्य सरकारनेही अर्थातच गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचे प्रगतीपुस्तक जनतेसमोर ठेवले आहे. केवळ निवडणूक प्रचारात अडकून पडता फडणवीस सरकारने भविष्यातील योजनांवरही काम करायला सुरुवात केली आहे. कार्यक्षम सरकार कघीच थांबत नसतं तर ते नेहमीच उद्याच्या विकासाचा विचार करीत असतं. याचा वस्तुपाठचं राज्य सरकारनं घालून दिला आहे.

जलयुक्त शिवार, शेततळी विहिरी बांधण्याबरोबरच राज्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून तब्बल १५ हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीतून आगामी तीन वर्षात ५२ पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याचेलक्ष्यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निश्चित केले आहे. या पाटबंधारे प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर राज्यत .९० लक्ष हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार असून ८९१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. अर्थातच त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनातही वाढ होणार आहे.

2014 ला सत्ता स्थापनेनंतर युतीच्या सरकारने सगळ्यात महत्वाचे कोणते काम केले असेल तर ते म्हणजे सिंचन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने सखोल आढावा घेण्यास सुरुवात केली. ज्या धरणांची कामे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहेत त्यांनाच पहिल्या टप्प्यात निधी देऊन ती पूर्ण करणे तसेच आवश्यक त्या कालव्यांची कामे  करणे आणि ज्या धरणांची गळती होत आहे त्यासाठी पाच हजार कोटी रुपये उपलब्ध करून गळती थांबविण्याला प्राधान्य देण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखले. आणि गेल्या पाच वर्षांत अगदीच किरकोळ अपवाद वगळता ते पुर्णत्वासही नेले.सध्या राज्यातील ३३४ पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरु असून त्यासाठी राज्य शासनाने आठ ते नऊ हजार कोटी रुपये जलसंपदा विभागाला उपलब्ध करून दिले आहेत. मात्र लाभक्षेत्र विकास कार्यक्रम, खारभूमी, जलविद्याुत प्रकल्प, पूरनियंत्रण आदी कामांसाठी आवश्यक ती तरतूद करावी लागत असल्यामुळे पाटबंधारे प्रकल्पासाठींच्या निधीत थोडी कपात करावी लागत असल्याचे दिसते.

या  पार्श्वभूमीवर राज्यातील सिंचन क्षमता निश्चित कालावधीत वाढण्यासाठी प्रगतीपथावरील ५२ प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना बळीराज जलसंजीवनी योजना या दोन्ही योजनेत समाविष्ट नसलेल्या प्रगतीपथावर असलेल्या ५२ प्रकल्पांची निवड करण्यात आली असून आगामी तीन वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्तीय संस्थांच्या माध्यमातून हे कर्ज घेण्यात येणार असून हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर .९० दशलक्ष हेक्टर अतिरिक्ति सिंचन क्षमता निर्माण होणार असून ८९१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठी तीन वर्षात निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहेया प्रकल्पात उर्वरित महाराष्ट्रात सहा मोठे प्रकल्प, १५ लघू तर सात मध्यम प्रकल्प आहेत. मराठवाड्यात दोन मोठे तर सहा लघू प्रकल्प, विदर्भात तीन लघू सात मध्यम प्रकल्प, अमरावती विभागात पाच मोठे दोन मध्यम प्रकल्प आहेत.

यावर्षी राज्याच्या एका भागात धोधो पाऊस तर दुसरा कोपरा कोरडा ठाक असे चित्र अनेकदा दिसले. या स्थितीवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी जागतिक बॅंक आणि आशियाई डेव्हलपमेंट बॅँक यांचे सहकारर्य़ घेण्यात येणार आहे. या योजनेनुसार  महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल. तसेच पूरग्रस्त भागात वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहणारे नियोजन केले जाणार आहे.

एका भागात महापूर आणि दुसरीकडे टँकरने पाणी पुरवठा असे विसंगत  चित्र बदलण्याचा निर्धार राज्य सरकरने केला आहे. त्याकरिता जागतिक बँकेचे २३ तज्ज्ञांचे पथक पश्चिाम महाराष्ट्रात महापुराचा आढावा घेऊन गेले. पुराचे पाणी दुष्काळी भागाला जाऊन तेथील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. या तिन्ही जिल्ह्यात पूरस्थिती येणार नाही अशी कायमची व्यवस्था केली जाणार आहे. या कामासाठी ते वर्षांचा अवधी लागेल. जागतिक बँक आणि आशियाई डेव्हलपमेंट बँक यांनीही या उपक्रमास सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.

सर्चशास्त्री

Share This
 •  
 • 1.6K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1.6K
  Shares
Article Categories:
KOMB

Leave a Reply

MENU