fbpx
Sep 20, 2019
1111 Views
2 0

दिल पुकारे…आरे आरे आरे

Written by

कार शेड आरे इथेच का ? इतर ठिकाणी का नाही बांधायची ? असे प्रथमदर्शनी योग्य आणि बिनतोड वाटणारे प्रश्न उपस्थित केले जातात.याबाबत सत्य परिस्थिती लोकांना समजणे आवश्यक आहे.

Share This
 •  
 • 1.2K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1.2K
  Shares

आरे कॉलनीत होऊ घातलेली मेट्रो ची कारशेड हा सध्या वादाचा विषय आहे. म्हणजे विषय वादाचा नाही, तो मुद्दामहून केला जात आहे.सामान्य माणूस हा वृक्षप्रेमी, जंगलप्रेमी पर्यावरणप्रेमी असतो. पर्यावरणाची हानी होत असेल तर तो सहन करत नाही. असा काही मुद्दा निघाला की तो पटकन प्रभावाखाली येतो. याच गोष्टीचा फायदा घेऊन काही गट सामान्य माणसाच्या मनात या कारशेडच्या विरोधात विष कालवत आहेत.लोकांना थापा मारत आहेत. खोटं बोलत आहेत. सामान्य माणसांनी या भूलथापांना बळी पडू नये. विकासाच्या मार्गात अडथळा म्हणून उभे राहू नये.

मेट्रोचे काम किती पूर्ण झाले आहे, दिरंगाई झाली तर दर दिवशी किती कोटी रुपयांचे नुकसान होते, CO2 उत्सर्जन कसे आटोक्यात येईल,इंधन किती वाचेल वगैरे वगैरे सर्व पब्लिक डोमेन मध्ये आहे

*आज पर्यायी जागा आणि वनजमीन याविषयी महत्वाच्या फॅक्टस तुमच्यासमोर मांडतो.*

कार शेड आरे इथेच काइतर ठिकाणी का नाही बांधायची ? असे प्रथमदर्शनी योग्य आणि बिनतोड वाटणारे प्रश्न उपस्थित केले जातात.याबाबत सत्य परिस्थिती लोकांना समजणे आवश्यक आहे.

मेट्रो प्लॅनिंग करताना कारशेडच्या जागेचा मुद्दा जेव्हा आला त्यावेळेस आरे कॉलनीसकट मुंबईतील ठिकाणांचा विचार झाला.बॅकबे रेक्लमेशन मुंबई पोर्ट ट्रस्ट, महालक्ष्मी रेसकोर्स,धारावी, बीकेसी कलिना, सारीपाट नगर, कांजूरमार्ग आणि आरे कॉलनी.सर्व बाबतींचा विचार होऊन आरे कॉलनीची जागा निश्चित केली गेली.

आरे कॉलनीला विरोध झाला आणि त्याची दखल घेऊन सरकारने मार्च २०१५ मध्ये एक तांत्रिक कमिटी स्थापन केली. ऑगस्ट २०१५ मध्ये त्या कमिटीने रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टमध्ये कांजूरमार्गच्या जागेसाठी प्रयत्न करावा, तीन महिन्यात ती नाही मिळाली तर आरे कॉलनीत शेड बांधावी आणि  पर्यावरणाची संभावित हानी टाळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे अशा तीन मुख्य सूचना केल्या.या कमिटीत डॉक्टर शाम असोलेकर आणि डॉक्टर राकेश कुमार हे दोन तज्ज्ञ होते त्यांनी आरे कॉलनीत जागा देण्यासाठी विरोध केला होता.डिसेंट नोट्स लिहिल्या होत्या.

कांजुरमार्गची जागा विविध कारणांमुळे घेणे शक्य झाले नाही आणि मग सरकारने आरे कॉलनीत मेट्रो कारशेड बांधण्याचे नक्की केले

पर्यायी जागेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात केस दाखल झाली होती. १५ एप्रिल २०१९ रोजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अधिपत्याखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत  दोन मिनिटांत हा अर्ज निकालात काढला गेला.तांत्रिक कमिटीने सर्व मुद्यांचा विचार केला असून यापुढे लक्ष घालण्यासारखे काहीही नाही असे सांगून याचिकाकर्त्यांना फटकारले

लोकांनी एक खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे

श्रीमती अमृता पृथ्वीश्वर भट्टाचारजी आणि श्री बिजू ऑगस्टीन कट्टाईन या दोन कार्यकर्त्यानी मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. मेट्रो कार शेड मुळे आरे कॉलनीतीलग्रीन कव्हरनष्ट होते का ? या मुद्द्यावर हा खटला लढला गेला.२६ ऑक्टोबर २०१८ रोजी हा निकाल लागला होता.एकूण १०० पानी सविस्तर निकालपत्रात आरे कॉलनीतील जमीन फॉरेस्ट लँड नाही असा निर्णय दिला आहे.

नॅशनल पार्क आणि आरे कॉलनी ते एकमेकांना लागून असल्यामुळे आरे हे जंगल आहे असे लोकांना खोटे सांगितले जात आहे. पूर्वीच्या आरे कॉलनीतील जमिनीपैकी २०७६ हेक्टर जमीन नॅशनल पार्कला ट्रान्सफर केली होती.आता आरे कॉलनीचे क्षेत्रफळ २१७८ हेक्टर असून त्यापैकी दक्षिण दिशेची ३० हेक्टर जमीन मेट्रो कारशेडला देण्यात आली आहे.

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट या दोन्ही संस्थानी कार शेडची जमीन त्या १२७८ हेक्टरपैकी असल्याने आम्ही याबाबत हस्तक्षेप करू शकत नाही असे सांगितले आहे.

आरे कॉलनीच्या एकूण जमिनीपैकी फक्त १५% टक्के जमिनीवर झाडे आहेत उरलेल्या जमिनीवर गवत आहे.शेडचे मुख्य बांधकाम गवताळ जमिनीवर होणार आहे.

या निकालात वर उल्लेख केलेल्या दोन पर्यावरण तज्ज्ञांनी लिहिलेल्या डिसेंटिंग नोट्सची दखल घेतली गेली आहे.निकालात न्यायाधीश असे म्हणतात की पर्यावरणाची हानी होईल याबाबत दुमत नाही परंतु जमिनीचे आरक्षण बदलताना सरकारने ज्या अटी घातल्या आहेत त्यात याची योग्य दाखल घेण्यात आली आहे, काळजी घेतली गेली आहे. त्या नोट्समधील मुद्द्यांच्या आधारे मेट्रो कार्ड शेडला परवानगी नाकारता येणार नाही.

एक गोष्ट लक्षात घ्या त्या अटींपैकी एक महत्त्वाची अट अशी आहे की या जमिनीवरती इतर कोणत्याही प्रकारचे व्यापारी बांधकाम करता येणार नाही.

सामान्य माणसाला हल्ली फक्त कोर्टावर भरवसा असतो. म्हणून वरील माहिती तुमच्यापर्यंत आणली.

“In any case of environment versus development, there will be at least some impact on the former. You cannot say no to development and push the society backwards,” 

हे मी म्हणत नसून काल च्या सुनवाईदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हंटले आहे..

गर्दीला, ट्रॅफिक जॅमला वैतागलेल्या मुंबईकरांच्या ओठांवर सध्या एकच गाणे आहे..

दिल पुकारेआरे आरे आरे

आनंद विश्वनाथन

Share This
 •  
 • 1.2K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1.2K
  Shares

Leave a Reply

MENU