fbpx
Oct 3, 2019
384 Views
0 1

“न्यू महाराष्ट्र” घडवण्याची संधी

Written by

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून हे राज्य अनेक वर्षे काँग्रेसच्या अधिपत्याखाली होते.येशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यासारखे यशस्वी मुख्यमंत्री या राज्याने पाहिले.राज्याची सामाजिक आणि राजकीय जडणघडण काँग्रेसी विचारांची राहिली आहे.

देशात इंदिरा गांधी विरोधी वातावरण होते तेव्हा महाराष्ट्रात काही काळ पुलोदचे सरकार होते पण त्यात काँग्रेसचे नेतेच महत्वाच्या पदांवर होते. त्यानंतरही उजव्या विचारसरणीच्या पक्षांना पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करता आलेले नाही.याधी १९९५ साली काही सीट्स कमी पडल्या होत्या.गेल्या वेळेस सुद्धा महाराष्ट्रात तसे म्हटले तर सुरुवातीला अल्पमताचेच सरकार स्थापन झाले होते. शिवसेनेने नंतर पाठिंबा येऊन सरकारला पूर्ण बहुमताचे बळ दिले. फडणवीस सरकारने प्रथमच महाराष्ट्रात पूर्ण कार्यकाळ राज्य करणारे गैरकाँग्रेसी सरकार हा मान प्राप्त केला आहे.

राज्याचे वातावरण सध्या ढवळून निघाले आहे.निवडणुका घोषित झाल्या की प्रत्येक वेळेस रुसवे फुगवे, तिकीट मिळणे, कापले जाणे,पक्षांतर, बंडखोरी,मैत्रीपूर्ण लढती असे सगळे राजकीय नाट्याचे अंक आपल्यास बघावयास मिळतात.आजही तसेच सुरू आहे. यात नवीन काहीही नाही. चार दिवसांत कोण कुणाविरुद्ध लढणार याचे चित्र स्पष्ट होईल.उमेदवाऱ्या मागे घेतल्या जातील आणि खऱ्या अर्थाने निवडणूकीत रंग भरेल. प्रचारासाठी फारच थोडे दिवस उरले आहेत

राज्याने प्रथमच तरुण,तडफदार, सुशिक्षित, भ्रष्टाचाराचा एक टक्काही आरोप नसलेला ,कार्यक्षम मुख्यमंत्री बघितला आहे  सर्व गटातटांना एकत्र घेऊन त्यांनी राज्य केले. अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याबाबत दक्षता घेतली. फडणवीस यांच्या हातात आघाडीच्या पंधरा वर्षांच्या राज्य कारभारानंतर  सत्ता आली होती. जादूची कांडी फिरवावी तसे राज्य बदलणे हे कधीच शक्य नसते. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो, अंतस्थ हेतू शुद्ध असावा लागतो. याबाबत फडणवीस नक्कीच उजवे ठरले आहे.

गेल्या वेळच्या निवडणुकीत आणि यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा फरक आहे.

गेल्या वेळेस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा निवडणुकीचा मुद्दा नव्हता. ती निवडणूक पूर्णपणे आघाडी सरकारचा कारभाराविरुद्ध असलेली हवा या मुद्द्यावर लढली गेली होती

जनता आघाडी सरकारला पूर्णपणे कंटाळली होती. पर्यायाच्या शोधात होती. युती झाल्यामुळे बऱ्यापैकी संभ्रम निर्माण झाला होता. त्याचा प्रत्यय निकालात दिसला. कुणालाही पूर्ण बहुमत मिळाले नाही.पण तब्बल १८५ सीटसवर विरोधी पक्ष विजयी झाले होते

भाजप संघटित राज्य नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत होती नरेंद्र मोदी हा फॅक्टर महत्त्वाचा होता

यंदा भाजप फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीस सामोरा जात आहे. त्यांच्या कारभाराचा लेखाजोखा घेऊन घेऊन निवडणुका लढवत आहे.थोडीफार अँटी एंक्युम्बन्सी नक्की असेल.

एक महत्त्वाचे साम्य म्हणजे गेल्यावेळी महाराष्ट्रात निवडणुका झाल्या त्याच्या  आधी लोकसभेत नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण बहुमत मिळवले होते  यंदा त्याहूनही अधिक सीट्स मिळवून पुन्हा नरेंद्र मोदी सत्तेवर आले आहेत  कोणाला आवडो वा ना आवडो नरेंद्र मोदी हा फॅक्टर या निवडणुकीत उपस्थित असेल याबद्दल कोणतीही शंका मनात नाही. तरीसुद्धा फडणवीस यांनी केलेल्या कारभाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही

फडणवीस यांच्या कार्यकिर्दीत खूप कामे झाली आहेत. त्याची माहिती वेळोवेळी त्यांच्या वेबसाइटवरून आणि ट्विटरवरून लोकांना मिळत असते. पक्ष कार्यकर्तेही ते लोकांपर्यंत पोचवत असतात. तरी पण माझ्या मते पाच ठळक कामे सांगायची झाली तर ती अशी आहेत

जलयुक्त शिवार योजना 

मोठ्या शहरांमधील मेट्रो प्रकल्प 

मराठा आरक्षण विधेयक

समृद्धी महामार्ग

पारदर्शक शेतकरी कर्जमाफी 

अजून खूप काही काम करायचे बाकी आहे. उणिवांवर बोट ठेवता येणे सहज शक्य आहे कारण ते अगदीच सोपे आहे. परंतु त्या उणिवा दूर करण्यासाठी कार्यक्षम सरकार पुन्हा  निवडून येणे अत्यंत आवश्यक आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र यांचे नाते अतूट आहे हे सर्वच मान्य करतात. महाराष्ट्र जितका शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे तितकाच तो टिळक, आगरकर, सावरकर आणि कर्वे यांचाही आहे.जातीच्या आधारावर सामाजिक शांततेला नख लावणाऱ्या लोकांचे कोणतेही प्रयत्न येथील जनता यशस्वी होऊ देणार नाही. या राज्याला सामाजिक सलोखा हवा आहे.समृद्धीची वाटचाल हवी आहे.

सध्याच्या वातावरणात जातीपातीपलीकडे देशाचा विचार करून मतदान झाल्याचे आपल्याला सलग दोन वेळा दिसून आले आहे. उत्तर प्रदेशसारख्या जातीच्या प्रभावाखाली असलेल्या राज्याने जातीयवादी समजल्या जाणाऱ्या भाजपला भरघोस मतदान केल्याचे उदाहरणही आपल्या डोळ्यासमोर आहे.

हान्यू इंडियाआहे

राष्ट्र प्रथमहा सगळ्यात महत्त्वाचा मंत्र देशस्तरावर असतो तर विधानसभा निवडणुकीतराज्य प्रथमहा मंत्र ज्या पक्षाच्या आचरणात आहे त्याला ही जनता निवडून देईल याबद्दल खात्री बाळगायला हरकत नाही.

न्यू महाराष्ट्रासमोर एक मोठी संधी आली आहे. तो काय निर्णय घेतो याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

आनंद विश्वनाथन

०३/१०/२०१९

Share This
 •  
 • 401
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  401
  Shares

Leave a Reply

MENU