fbpx
Sep 22, 2019
408 Views
0 0

मधमाशी पालन व्यवसाय – यशोगाथा

Written by

जिथे सबसिडी मिळणे शक्य आहे त्याचा पाठपुरावा करून सबसिडी मिळवली. आज त्यांनी १० पेट्या घेतल्या आहेत. एका पेटी मधून त्यांना १२ ते १५ किलो मध मिळतो. त्याच प्रमाणे नवी पेट्यांची वसाहत करण्याचे कामही ते शिकले. अशा १०-१५ पेट्या ते तयार करून विकतात. त्याचाही दर त्यांना पेटीमागे ६००० रुपये असा मिळतो. अशा प्रकारे वर्षाकाठी त्यांना सव्वा ते दीड लाख अतिरिक्त उत्पन्न मधमाशीच्या व्यवसायातून मिळते आहे.

Share This
 •  
 • 395
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  395
  Shares

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जेमतेम पर्जन्यमान आहे. कोरडवाहू म्हटल्या जाणाऱ्या ह्या प्रकारच्या शेतजमिनीत जेमतेम एक पीक येते अशी स्थिती आहे. अशा शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन हा पूरक व्यवसाय म्हणून चांगला आधार असू शकतो. आज अनेक शेतकरी हा जोडधंदा करीत आहेत. मधमाशा पालनामुळे जादाची अर्थप्राप्ती होते हे तर आहेच पण आपल्या शेताच्या परिसरात मधुमक्षिका पालन केल्यामुळे शेताला, बागायतीला उत्पन्न वाढीसाठी भरपूर फायदा होतो कारण शेतात बागांत ठेवलेल्या मधमाशा चांगल्या पिकासाठी लागणारे परागसिंचनाचे काम चोख करतात. ह्या कामासाठी लागणारे प्रशिक्षण सरकारच्या कृषीखात्यातर्फे तसेच खादीग्रामोद्योग बोर्डातर्फे केले जाते. ह्या व्यवसायात पडलेल्या शेतकऱ्यांच्या काही यशोगाथा… 

वर्धा जिल्ह्यातील टाकळी येथील अनेक तरुण ह्या व्यवसायात पडले आहेत. चेतन सोनटक्के त्याचे काही मित्र आता व्यवसायातील सहकारी मधुमक्षिका पालन ह्या व्यवसायात आले. चेतन यांनी ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र ह्या वर्धा जिल्ह्यातील एका संस्थेत त्यांनी ह्या व्यवसायाला लागणारे प्रशिक्षण घेतले. खादी आणि ग्रामोद्योग खात्यानेही त्यांना विविध प्रकारे मदत केली. सुरुवातीला २० पेट्या खेऊन. एकंदर चार प्रकारच्या मधमाश्यांचे संगोपन केले आहे. काही मधमाशा मधाचे उत्पादन अधिक करतात तर काही प्रकारच्या मधमाशा परागीभवनाला हातभार लावतात. त्यामुळे अनेक शेतकरी ह्या पेट्या आपल्या शेतात ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतात. आलेल्या मधाचे कधी घाऊक व्यापाऱ्यांच्या मार्फत तर कधी थेट ग्राहकासाठी विक्री करून देखील ते आपला मध बाजारात आणतात. हिवाळ्यात सरसू, सूर्यफूल अशी पिके घेणाऱ्या शेतात ह्या पेट्या ठेवण्यात येतात ह्या करिता विदर्भ सोडून अन्यत्र कधीतर पंजाब परिसरातदेखील पेट्या घेऊन जातात.

विदर्भातील विलास चरडे हे विदर्भातील चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी. शेतजमीन दोन एकर. शिक्षण १२ वी. त्यांनी खादी ग्रामोद्योग केंद्रामधून प्रशिक्षण घेतले. दोन पेट्या इतक्या छोट्या प्रमाणावर सुरुवात केली. सरकारी योजनांची नीट माहिती करून घेतली. जिथे सबसिडी मिळणे शक्य आहे त्याचा पाठपुरावा करून सबसिडी मिळवली. आज त्यांनी १० पेट्या घेतल्या आहेत. एका पेटी मधून त्यांना १२ ते १५ किलो मध मिळतो. त्याच प्रमाणे नवी पेट्यांची वसाहत करण्याचे कामही ते शिकले. अशा १०१५ पेट्या ते तयार करून विकतात. त्याचाही दर त्यांना पेटीमागे ६००० रुपये असा मिळतो. अशा प्रकारे वर्षाकाठी त्यांना सव्वा ते दीड लाख अतिरिक्त उत्पन्न मधमाशीच्या व्यवसायातून मिळते आहे.

आज मधमाशी पालन व्यवसायाला भरपूर संधी आहेत. महाबळेश्वर येथे हे काम अत्यंत पद्धतशीर मोठ्या प्रमाणावर होते आहे. असे म्हणतात की महाराष्ट्रातील मध उत्पादनाच्या तब्बल ५०% उत्पादन फक्त महाबळेश्वर येथे होते. सुरुवातीचा पेट्यांचा खर्च पेट्यांची जपणूक करणे ह्या व्यतिरिक्त कुठलाही खर्च ह्याला लगत नाही. जागा नाही, वीज नाही, गुंतागुंतीचे तंत्रज्ञान नाही. मधाव्यतिरिक्त रॉयल जेली, मधमाशांचे विष, परागकण, मेण अशी विविध अनुषंगिक उत्पादने देखील शेतकऱ्याला चांगला पैसा देऊन जातात. वाढते शहरीकरण, नैसर्गिक गोडवा असणारे पदार्थ वापरण्याकडे वाढणारा कल, आयुर्वेदाचा वाढता प्रसार, फिटनेसबद्दल जागरुकता अशा विविध कारणामुळे भारतात मधाचा खप पुढील काळात वाढता राहणार आहे. हे ओळखून महाराष्ट्रातील तरुण शेतकरी उद्योजक ह्या क्षेत्राकडे वळत आहेत ही चांगली गोष्ट आहे.

हिरण्य सूर्यवंशी

Share This
 •  
 • 395
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  395
  Shares
Article Tags:
· ·

Leave a Reply

MENU