fbpx
Sep 15, 2019
534 Views
1 0

महाराष्ट्राच्या यशो’मुद्रा’

Written by

मुंबईच्या सुशीला कुचेकर ह्यांचा घरगुती मसाले बनवण्याचा व्यवसाय होता. मुद्रा योजने अंतर्गत मुंबईच्या बँक ऑफ बरोडाने त्यांना सहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्याचा उपयोग त्यांचा घरगुती व्यवसाय अधिक व्यावसायिक पद्धतीने करण्यासाठी झाला. स्वत:चा ब्रँड प्रस्थापित करणे, त्या नावाने मसाल्याच्या पदार्थांचे/ उत्पादनांचे पॅकिंग त्यांनी सुरु केले. घरगुती पद्धतीने विकले जाणारे मसाले ‘कृपा मसाले’ ह्या नावाने, आकर्षक पद्धतीने विकले जाऊ लागले

Share This
 •  
 • 1.1K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1.1K
  Shares

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रहाने राबवलेली मुद्रा योजना गेल्या चार वर्षात स्थिर झाली आहे. आजवर बँकेचे वा कुठल्याहीधनकोचे कर्ज घेण्यासाठी तोंड पाहिलेले अनेक उद्योजक ह्या योजने अंतर्गत कर्ज मिळवून आपले लहानमोठे व्यवसाय करीत आहेत. ह्या योजनेचे वर्णन इंग्रजीत Funding the Unfunded असे यथार्थ पणे केले आहे. महाराष्ट्रातही ह्या योजने अंतर्गत कर्ज मिळवलेले यशस्वी उद्योजक अनेक आहेत त्यापैकी काही जणांच्या यशोगाथा आज लिहिणार आहे.

मुंबईच्या सुशीला कुचेकर ह्यांचा घरगुती मसाले बनवण्याचा व्यवसाय होता. मुद्रा योजने अंतर्गत मुंबईच्या बँक ऑफ बरोडाने त्यांना सहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्याचा उपयोग त्यांचा घरगुती व्यवसाय अधिक व्यावसायिक पद्धतीने करण्यासाठी झाला. स्वत:चा ब्रँड प्रस्थापित करणे, त्या नावाने मसाल्याच्या पदार्थांचे/ उत्पादनांचे पॅकिंग त्यांनी सुरु केले. घरगुती पद्धतीने विकले जाणारे मसालेकृपा मसालेह्या नावाने, आकर्षक पद्धतीने विकले जाऊ लागले. मसाले बनवणे, पॅकिंग, मार्केटिंग ह्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री, कच्चामाल अशा विविध गोष्टींसाठी लागणारे फंड क्रेडीट मिळाल्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवता आला. घरगुती पातळीवर चालणाऱ्या व्यवसायात वाढ होऊन आणखी काही महिला कर्मचाऱ्यांनाही सुशीला कुचेकर यांच्याकृपा मसालेह्या व्यवसायाने कायमचा रोजगार मिळू शकला

अशीच गोष्ट आहे मनीष म्हात्रे यांची. पालघर येथील ह्या तरुणाने स्पोर्ट्स वेअर, टीशर्ट बनवणे असा व्यवसाय सुरु केला. त्यांनी एका छोट्या जागेत कारखाना थाटून हे काम सुरु केले होते. पण विशिष्ट टप्प्यानंतर त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी निकड जाणवू लागली. त्यांना मुद्रा योजने अंतर्गत व्यवसाय वृद्धीकरिता कर्ज मिळाले. मुंबईच्या बँक ऑफ इंडिया ह्या राष्ट्रीकृत बँकेने लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी टीशर्ट वगैरे कपड्यावर प्रिंटींग करणारे एक प्रिंटींग मशीन विकत घेतले. त्यामुळे मूल्यवृद्धी साधली गेली. त्यांनी शिवलेल्या त्यावर वैविध्यपूर्ण प्रिंटींग केलेल्या कपड्यांना विविध ठिकाणहून मागणी येऊ लागली. आज त्यांच्या सोबत अजून जणांना ह्या व्यवसायामुळे नोकऱ्या मिळाल्या आहेत.  

नव्या मुंबई मधील पुष्पा बनसोडे यांचेही उदाहरण देखील असेच स्पृहणीय आहे. त्यांचे स्वप्न होते व्यवसाय करण्याचे. मुद्रा योजनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी एक योजना बनवली आणि सिल्व्हर पेपर कोटेड पेपर प्लेट, पेपर बाउल बनवण्याचा व्यवसाय करायचे ठरवले. बँक ऑफ इंडिया ह्या राष्ट्रीकृत बँकेने त्यांची योजना पारखून लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यातून त्यांनी कागदी प्लेट, बाउल बनव्याची यंत्रसामुग्री कच्चा माल घेतला. आज त्यांचा व्यवसाय स्थिर झाला आहे. त्यांच्या घराण्यात पहिला वाहिला व्यवसाय सुरु झाला. एका स्वप्नाची पूर्तता झाली.  

अशी शेकडो/हजारो उदाहरणे भारतभर पसरली आहेत. राज्याराज्यात आहेत. आजवर सार्वजनिक क्षेत्रातील वा खाजगी अशा कोणत्याच बँकेच्या प्रभाव क्षेत्रात आलेल्या, आजवर बिझिनेस साठी क्रेडीट, कर्ज वगैरे मिळू शकलेल्या अनेक स्वप्नांचा आधार बनली आहे ही मुद्रा योजना

हिरण्य सूर्यवंशी

Share This
 •  
 • 1.1K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1.1K
  Shares

Leave a Reply

MENU