fbpx
Oct 1, 2019
756 Views
0 6

‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेमुळे येडशी गाव बनले ४० शेततळ्यांचे गाव

Written by

राजा विक्रमादित्य झाडाजवळ गेला, प्रेत उतरवून त्याने खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे चालू लागला. तेव्हा वेताळाने विचारले, “राजन, तु शासनाच्या एवढ्या योजना सांगतोस पण त्या योजनांचा फायदा कोणाला झाला आहे का?”

राजा विक्रमादित्याने क्षणभर विचार केला म्हणाला…   

उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी गावचे अशोकराव गणपतराव मेंढेकर या शेतकर्‍याची गोष्ट. त्यांच्याकडे ४२ एकर शेती आहे, पण पूर्णतः पावसावर अवलंबून असल्यामुळे एवढी शेती असूनही त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. आपल्या शेतात ते संकरित ज्वारी, भुईमूग, तूर, मूग, उडीद, मका अशी पिके ते घेत होते. पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादन कमी मिळत होते आणि त्यामुळे आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली होती. २०११ साली अशोकराव सोयाबीन या नगदी पिकाकडे आकर्षित झाले. सुरुवातीला त्यांना चांगले उत्पन्न मिळाले परंतु हवामानाच्या विपरित परिणामांमुळे तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिकाचेही उत्पादन कमी होऊ लागले. पाण्याच्या अडचणीवर काहीतरी कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी ते विचार करीत असताना त्यांना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षीमागेल त्याला शेततळेया योजनेची माहिती मिळाली

२०१६ मध्ये अशोक मेंढेकर यांना ३० X ३० X मीटर आकाराचे शेततळे मंजूर झाले आणि त्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून ५० हजार रुपये अनुदान मिळाले. शेततळ्याला राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्लास्टिक अस्तरीकरण करण्यात आले यासाठी देखील ७५ हजार रुपये अनुदान शासनाकडून मिळाले. शेततळ्यामध्ये ४० लाख लिटर पाणीसाठा झाला. ओसाड जमिनीवर आता एकरात सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष लागवड केली. दिड एकर शेतावर G-9 जातीची केळी लागवड केली. सध्या दोन्ही बागा फळांनी भरलेल्या आहेत. अडीच एकरात मल्चींग करुन टोमॅटोची लागवड केली. सदरची कामं आत्मा अंतर्गत शेतकरी गटाच्या माध्यमातून करण्यात आली. विशेष म्हणजे या गटातील शेतकऱ्यांनी सुद्धा शेततळे घेऊन त्यात अस्तरीकरण करून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी अशोकरावांचे अनुकरण केले

आज गावामध्ये ४० शेततळी मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत पूर्ण करण्यात आली आहेत. शेतकरी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक तुषार सिंचनद्वारे शेती करण्यावर भर देतात. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, ट्रॉली, पेरणी यंत्र, रोटावेटर या शेतीयंत्रांचा वापर करतात. आता येथील शेतकऱ्यांना शेतमालाचे चांगले उत्पन्न मिळत आहे. अशोकराव आणि त्यांचे सारे कुटुंब, सर्व शेतकरी गटातील सदस्य महाराष्ट्र शासनाचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानतात असे म्हणत राजा विक्रमादित्य बोलायचा थांबला.  

राजा, खरं तर मला या गोष्टीशी काही देणेघेणे नाही, मला फक्त तुला बोलते करायचे होते. तुझ्या उत्तरामुळे माझे समाधान झाले पण तु मौन सोडलेस, आता मला जावे लागेल. असे म्हणून वेताळ मोठमोठ्याने हसत प्रेतासह गायब झाला आणि पुन्हा झाडावर लोंबकळू लागला.

Share This
 •  
 • 769
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  769
  Shares
Article Tags:
·

Leave a Reply

MENU