fbpx
Feb 25, 2019
493 Views
22 3

मृदा आरोग्य पत्र

Written by

पंतप्रधान मोदी यांचा ‘मृदा आरोग्य पत्र’ किंवा ‘Soil Health Card’ देण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. आपल्या शेतातील मातीची अशी तपासणी व्यक्तिगत पणे काही शेतकऱ्यांनी केलीही असेल. पण सरकारी पुढाकाराने एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून असा उपक्रम पहिल्यांदाच होत आहे. जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश ह्या मुलद्रव्यांची स्थिती (NPK Values) समजली, जमीन किती अल्कधर्मी वा आम्लधर्मी आहे (pH), जमिनीत किती सूक्ष्म-पोषणद्रव्य (Micro Nutrient) आहेत त्यावर त्या जमिनीत कुठचे पीक येऊ शकते. ती जमीन किती सुपीक आहे. नसेल तर कुठल्या प्रकारची खते दिल्यावर ती चांगले पीक देईल ह्याचे शास्त्रशुद्ध अंदाज बांधता येतात. ह्या योजने अंतर्गत आजवर सोळा कोटी चाळीस लाख जमिनींची तपासणी होऊन तशी ‘मृदा आरोग्य पत्रे’ वितरीत करण्यात आली आहेत. सरकारने शेतकऱ्यासाठी काय काय करता येईल ह्याचा बारकाईने विचार करून केलेल्या अनेक योजनांपैकी ही एक योजना आहे.

Share This
 •  
 • 39
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  39
  Shares
Article Tags:
·

Leave a Reply

MENU