fbpx
Aug 15, 2019
550 Views
3 0

लोकांचा पंतप्रधान

Written by

मोदी यांनी लोकांना पर्यटनविषयक महत्वाचे आवाहन केले आहे.पुढील तीन वर्षांत म्हणजे २०२२ पर्यंत देशातील कमीत कमी १५ ठिकाणी जावे असे हे आवाहन आहे. नुसते जाऊ नका तर त्या ठिकाणांबद्दल चारचौघांमध्ये चर्चा करा ज्यायोगे ती सर्व ठिकाणे पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून नावारूपास येऊ लागतील.

Share This
 •  
 • 753
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  753
  Shares

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आपले सहावे आणि या टर्मचे पहिले भाषण आज सकाळी केले. मोदी सत्तेत आल्यापासून पंधरा ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.याचे मुख्य कारण म्हणजे अनपेक्षित , राजकीय पंडितांच्या कल्पनेबाहेरील मुद्द्यांना ते थेट हात घालतात.आपल्या खास शैलीत ते लोकांना आवाहन करतात,अभिजनांना विचारप्रवृत्त करतात आणि विरोधकांना बेसावध पकडतात.अर्थातच देशभर चर्चा घडवून आणतात.

मोदींबाबत एक महत्त्वाची बाब मला लक्षात आणून द्यायची आहे. मोदी यांचा थेट जनतेशी कनेक्ट आहे.इमोशनल बॉण्ड आहे. मोदींना जनतेची नस समजते. हा बंध त्यांनी स्वतः निर्माण केला आहे आणि प्रयत्नपूर्वक जोपासला आहे.बहुसंख्य जनतेला मोदी हा आपला माणूस वाटतो आणि मोदी हे जनतेला आपले समजतात. मोदींना खात्री असते की जर त्यांनी जनतेला एखादे आवाहन केले तर जनता  नक्की ऐकेल. यापूर्वीच्या टर्ममध्ये याचा अनुभव सगळ्यांनी घेतला आहेच

आजच्या त्यांच्या भाषणात कमीत कमी २० ते २५ महत्त्वाचे मुद्दे आहेत. या ठिकाणी लोकांना केलेल्या आवाहनाशी संबंधित जे मुद्दे आहेत त्यावर लिहिणार आहे. मला असे ठळक मुद्दे या भाषणात जाणवले

आपल्या देशाची लोकसंख्या मोठी आहे. आणि त्याची वाढही मोठय़ा प्रमाणावर होते आहे. लोकसंख्येचा विस्फोट झाला तर या देशातील सर्व साधने अपुरी पडतील. अराजक माजेल. मुले जन्माला घालताना मुलांच्या भवितव्याबद्दल विचार करणे आवश्यक आहे. त्यात त्या अपत्याचे आणि देशाचे असे दुहेरी हित आहे.असा विचार त्यांनी मांडला.ज्यांना  एकच अपत्य आहे त्यांचा आदर्श इतरांनी बिंबवून घेतला पाहिजे असे मोदी यांनी सांगितले.इतक्या स्पष्टपणे आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने या विषयाला हात घातला नव्हता. मोदी यांनी थेट स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात उल्लेख करून अनेकांना आश्चर्यचकित केले असणार. किती मुले असावीत हा वैयक्तिक मामला असला तरीही त्याला देशाच्या प्रगतीशी जोडून मोदी यांनी एक वेगळेच आवाहन देशवासियांना केले आहे.हेच मोदींचे वेगळेपण आहे आणि यासाठी ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत

दुसरे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. खते शेतीसाठी अत्यंत आवश्यक असतात.आजच्या भाषणात मोदी यांनी रासायनिक खते वापरू नका असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे शेतमालाच्या दर्जावर आणि म्हणून आरोग्यावर विपरीत परिणाम होतो असे अनेक संशोधनांती सिद्ध झाले आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा सगळा देशवासियांनाच मिळणार आहे.याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी बद्दल उलटसुलट चर्चा होईल.पण मोदी यांनी विषय तर छेडला आहे.

मोदी यांनी लोकांना पर्यटनविषयक महत्वाचे आवाहन केले आहे.पुढील तीन वर्षांत म्हणजे २०२२ पर्यंत देशातील कमीत कमी १५ ठिकाणी जावे असे हे आवाहन आहे. नुसते जाऊ नका तर त्या ठिकाणांबद्दल चारचौघांमध्ये चर्चा करा ज्यायोगे ती सर्व ठिकाणे पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून नावारूपास येऊ लागतील. दळणवळणाच्या साधनांची कमतरता असेल तरीही तुम्ही तिथे जाणे टाळू नका असेही ते म्हणाले. त्यांचा लॉंग टर्म व्ह्यू आहे.पर्यटन हे परदेशी चलन मिळवून देण्याचे महत्वाचे साधन आहे. परदेशी पर्यटकांसाठी आवश्यक असलेले टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यात सरकार कोणतीही कुचराई करणार नाही याबद्दल आपण निश्चिंत असावे.

चौथे आवाहन त्यांनी जनतेला केलेच पण त्यापेक्षा जास्त दुकानदारांना केले. ते प्लास्टिकच्या वापराच्या संदर्भात होते. बाजारहाट करताना प्लास्टिक पिशव्या वापरण्याची सवय इतकी आपल्या रक्तात भिनली आहे की प्लास्टिक बंदी करून सुद्धा ती पुरेशी राबवली जात नाही. राबवणे कठीण असते असे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. मोदींनी  दुकानदारांना असे आवाहन केले कि तुम्ही ठळकपणे तुमच्या दुकानावरचीयेथे प्लास्टिकची पिशवी मिळणार नाहीअसा बोर्ड लावा. लोकांनाही त्यांनी कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवात करा असे सांगितले. यापुढेही जाऊन त्यांनी असे सांगितले की एकमेकांना जवळ भेटवस्तू दिल्या जातात त्या भेटवस्तूंमध्ये कापडी पिशव्यांचा समावेश करा. अगदी लहान लहान गोष्टीतून देशकार्य कसे करता येईल याचा एक वस्तुपाठ घालून दिला. एक पंतप्रधान इतक्या लहान सहान बाबींचा करेल याचा कुणीही अंदाज बांधणार नाही .

धक्का देणे हीच मोदींची खासियत आहे.त्यांचे भाषण समाजशास्त्र शिकणाऱ्या सर्वांसाठी एक उत्तम वस्तुपाठ असते.एक लोकनेता म्हणून ते कसे बोलतात आणि एक राजकीय नेता म्हणून कसे बोलतात यामधील फरक अभ्यासू नजरेस नक्की जाणवेल.

लोकांच्या मनात त्यांच्या विषयी एक आदरभाव आहे.जो विरोधक ओळखू शकत नाहीत. खऱ्या अर्थाने ते लोकांचा पंतप्रधान आहेत. इंग्लिशमधील “People’s Prime Minister” या गौरवपर संज्ञेला ते पुरेपूर पात्र आहेत

आनंद विश्वनाथन

Share This
 •  
 • 753
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  753
  Shares

Leave a Reply

MENU