fbpx
Jun 6, 2019
557 Views
0 1

विकसित राज्याचा आलेख

Written by

लोकांना आज खूप त्रास सहन करावा लागत आहे परंतु उद्या मिळणाऱ्या सुखासाठी ते निमूटपणे सहन करीत आहेत.जे मुंबईत नियमितपणे प्रवास करतात त्यांना मेट्रोचे काम किती वेगाने चालले आहे ते माहीत आहे. परवानग्यांचे असंख्य अडथळे पार करून मेट्रोचे अनेक मार्ग सुरू होणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रोच्या कामाच्या प्रगतीकडे काटेकोर लक्ष असते.

Share This
 •  
 • 668
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  668
  Shares

भारतामध्ये महाराष्ट्र हे एक विकसित राज्य समजले जाते. झपाट्याने झालेले औद्योगिकीकरण,सहकारी साखर कारखाने, राजधानी मुंबईचे आर्थिक जगतातील महत्व अशा अनेक गोष्टी आहेत.महाराष्ट्राचा विकास म्हणजे सर्वप्रथम मुंबई पुणे पट्टा नजरेसमोर येतो. त्यानंतर नाशिक,कोल्हापूर,जळगाव औरंगाबाद, लातूर इत्यादी शहरे येतात.

परराज्यातील लोकांचे लोंढे मुंबईमध्ये स्थायिक झाले हे सर्वश्रुत आहे.नागरी सुविधांवर खूपच ताण पडला आहे. वाहतुकीची समस्या जटील झाली आहे.रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत रोज भर पडत आहे.लक्षावधी माणसे रोज मुंबईत प्रवास करतात. मुंबईची भौगोलिक रचना चिंचोळी आहे.उत्तर दक्षिण असे तीन रेल्वेमार्ग आणि चार महत्वाचे रस्ते या नाड्या आहेत.

पूर्व पश्चिम जोडणी करणारे रस्ते तुलनेने खूप कमी होते. जे निर्माण झाले त्यावर बोजा पडला आहे. अशी रेल्वे असावी हे खूप उशीरा सुचले. पहिली मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर अशी सुरू झाली. ती उत्तम सुरू आहे.

वेगवान ,आरामदायी आणि परवडणारा प्रवास म्हणून मेट्रोचे महत्त्व आहे. फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मेट्रोच्या कामाला प्रचंड गती मिळाली आहे. पुढील वर्षांत मुंबई आणि जवळपासच्या सर्व परिसरात मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.

 लोकांना आज खूप त्रास सहन करावा लागत आहे परंतु उद्या मिळणाऱ्या सुखासाठी ते निमूटपणे सहन करीत आहेत.जे मुंबईत नियमितपणे प्रवास करतात त्यांना मेट्रोचे काम किती वेगाने चालले आहे ते माहीत आहे. परवानग्यांचे असंख्य अडथळे पार करून मेट्रोचे अनेक मार्ग सुरू होणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रोच्या कामाच्या प्रगतीकडे काटेकोर लक्ष असते.

नागपूरला मेट्रो सुरू झाली ,पुण्यामध्ये काम सुरू आहे. खरे तर या महत्वाच्या शहरांमध्ये मेट्रो याधीच सुरू व्हायला हवी होती. परंतु  व्हिजन नव्हते. गेल्या युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांनी पायाभूत सुविधांमध्ये भरीव कामगिरी केली होती. मुंबई पुणे एक्सप्रेस वे, मुंबईतील ५५ उड्डाणपूल ही त्यांची देणगी.

ही योगायोगाची गोष्ट नाही की पुन्हा युती सरकार आल्यानंतरच या प्रश्नांकडे गंभीरतेने लक्ष देण्यात आले आहे.लोकांचे दैनंदिन जीवन सुखकर व्हावे त्यांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी इतर सरकारांच्या तुलनेत सध्याच्या युती सरकारने वेळीच लक्ष घातले आहे.आणि या पुढेही घातले जाईल याबद्दल खात्री बाळगायला हरकत नाही.

महाराष्ट्रात झालेली नागरी विकासाची,इन्फ्रास्ट्रक्चरची कामे याविषयी मी येथे लिहीणार आहे.

आनंद विश्वनाथन

Share This
 •  
 • 668
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  668
  Shares

Leave a Reply

MENU