fbpx
Oct 10, 2019
379 Views
2 0

सक्षम शेतकरी

Written by

भविष्यातील योजना
शेतकर्‍यांना सक्षम बनवण्यासाठी व अडीच एकर पर्यंत जमीन असलेल्या
शेतकर्‍याला कापणी पूर्वप्रक्रिया, शेतीचे संरक्षण (कुंपण), पाण्याची उपलब्धता,
गोदाम, शेतात राहण्याची सोय, शेळ्यामेंढ्यांसाठी कोठा, कौशल्य प्रशिक्षण व
विक्रीशास्त्राचे संपूर्ण ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी 100-100 शेतकर्‍यांचा गट
बनवून इंन्टिग्रेटेड फार्मर मॉड्यूल योजना राबवण्याचा मानस असून, त्याबाबत
सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022
पर्यंतचे ध्येय समोर ठेऊन ‘शेतकरी कुटुंब केंद्रीत’ कार्यक्रमाचा कृती आराखडा तयार
केला आहे. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्हे, नक्षलग्रस्त जिल्हे व कायम
दुष्काळग्रस्त जिल्हे यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांचे कुटुंब हा एक
महत्त्वाचा घटक असून त्यांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.

पीक विमा
जोखमीच्या काळात शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना
सुरू करण्यात आली. हवामानावर आधारित पीक विमा योजना देखील राबवण्यात
येते. मागील वर्षी 91 लाख शेतकर्‍यांनी पीक विमा काढला व त्यातील आतापर्यंत
49 लाख शेतकर्‍यांना पीक विमा मिळाला आहे. हवामानावर आधारित फळबागांना
शंभर टक्के विमा मिळाला आहे.

निम पार्क
कडुनिंबापासून सेंद्रीय कीटकनाशक तयार करण्यासाठी राज्यात निमपार्क उभारण्यात
येणार आहेत. यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व जैविक शेतीच्या
माध्यमातून शेतकर्‍यांना मोठा फायदा होईल. त्यासाठी जैविक शेतीला चालना
दिली आहे.

पाठपुरावा
शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादन वाढवणे,
रासायनिक खतांचा वापर कमी करणे, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जैविक
शेतीसोबत सांगड घालण, वाढलेल्या उत्पादनाला योग्य भाव मिळवून देण्याकरिता
बाजारपेठ उपलब्ध करून देणे या सर्व गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा करणे अशा
प्रकारे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 100-100 शेतकरी
कुटुंबाचे पालकत्व समाजसेवी संस्था, शेतीतज्ज्ञ, शेतकरी कंपन्या यांना दिले जाणार
आहे. आमूलाग्र बदल करून शेतकर्‍यांना आर्थिक समृद्धी मिळवून देण्याचे
उद्दिष्ट आहे. शेतकर्‍याची आत्महत्या हा शासनासाठी दुःखद प्रसंग ठरतो. त्यामुळे
यापुढे अशा घटना टाळण्यासाठी ‘शेतकरी कुटुंबकेंद्रित कार्यक्रम’ राबवला जाणार
आहे.

Share This
 •  
 • 824
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  824
  Shares
Article Categories:
Uncategorized

Leave a Reply

MENU