fbpx
Sep 22, 2019
385 Views
1 0

‘स्टार्ट अप’मुळे मिळाली गती

Written by

आजवर फक्त क्लासरुम व पुस्तकी शिक्षण देण्यावर भर देण्यात आला. परंतु एखाद्या व्यक्तीला 

स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी उपयुक्त असे कौशल्य प्रदान करण्यावर भर दिला गेला नाही. नेमकी हीच गरज ओळखत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकासासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला. आता समाजातील विविध स्तरांतील घटकांना वेगवेगळे कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

महाराष्ट्रात स्टार्ट अप योजनांना चांगलाच प्रतिसाद मिळत असून, आता अधिकाधिक युवा वर्ग ‘स्टार्टअप‘कडे येत आहे. देशात आलेल्या एकूण स्टार्टअपपैकी सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रातील आहेत. ‘प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना’तून सुमारे साडे तीन लाख लोकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये 57 टक्के महिलांचा सहभाग आहे. आतापर्यंत सुमारे दीड लाखांच्या वर तरुणतरुणींना रोजगार/स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे. विविध कंपन्याशी एकूण 140 सामंजस्य करार करण्यात आले. आयटीआयचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरण केले आहे. आयटीआय उत्तीर्णांना दहावी आणि बारावीची समकक्षता देण्यात आली आहे.

‘स्टार्टअप‘च्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनावर आधारित नवीन उद्योजक महाराष्ट्रात घडावेत यासाठी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यात येत आहे. शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागातील उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी स्टार्टअप सप्ताह/ स्टार्टअप यात्रा यासारखे उपक्रम राज्यात राबवण्यात येत आहेत.

युवकांना कर्ज उपलब्ध 

युवा वर्ग सक्षम व्हावा, यासाठी ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’द्वारे कर्ज देण्यात येत आहे. जवळपास 18 हजार युवक/युवतींना 10लाखापर्यंतचे कर्ज व्यक्तिगत कर्ज योजनेच्या माध्यमातून देण्यात आले. 26 लाभार्थींना 50 लाखापर्यंतचे कर्ज देण्यात आले.

Share This
 •  
 • 915
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  915
  Shares
Article Categories:
Uncategorized

Leave a Reply

MENU