fbpx
Sep 18, 2019
613 Views
0 1

होय! याच सरकारने दिला आम्हाला मदतीचा हात

Written by

राजा विक्रमादित्याने क्षणभर विचार केला व म्हणाला… जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीच्या अगदी काठावर असलेल्या नंदगाव या छोट्याश्या गावाच्या रहिवासी श्रीमती सुमनबाई गुलाबराव पाटील यांची ही गोष्ट. ११ वर्षांपूर्वी तरुण मुलाचा आणि सात वर्षांपूर्वी पती व गावाचे माजी पोलिस पाटील गुलाबराव पाटील यांचा मृत्यू असे दोन आघात या माऊलीने सहन केले पण त्या हिम्मत हरल्या नाहीत किंवा महिला म्हणून कोणाकडे दया-याचना करत बसल्या नाहीत.

Share This
 •  
 • 1K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1K
  Shares

महाराष्ट्राची यशोगाथा: श्रीमती सुमनबाई पाटील म्हणतात, होय! याच सरकारने दिला आम्हाला मदतीचा हात

राजा विक्रमादित्य झाडाजवळ गेला, प्रेत उतरवून त्याने खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे चालू लागला. तेव्हा वेताळाने विचारले, “राजन, तु शासनाच्या एवढ्या योजना सांगतोस पण त्या योजनांचा फायदा कोणाला झाला आहे का?”

राजा विक्रमादित्याने क्षणभर विचार केला म्हणाला…                                                             जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीच्या अगदी काठावर असलेल्या नंदगाव या छोट्याश्या गावाच्या रहिवासी श्रीमती सुमनबाई गुलाबराव पाटील यांची ही गोष्ट. ११ वर्षांपूर्वी तरुण मुलाचा आणि सात वर्षांपूर्वी पती गावाचे माजी पोलिस पाटील गुलाबराव पाटील यांचा मृत्यू असे दोन आघात या माऊलीने सहन केले पण त्या हिम्मत हरल्या नाहीत किंवा महिला म्हणून कोणाकडे दयायाचना करत बसल्या नाहीत. अचानकपणे शेतीची जबाबदारी त्यांच्यावर आली त्यांना शेतीकामाची फारशी माहिती नव्हती म्हणून त्यांनी सुरवातीला निमबटाईने शेती दिली. निमबटाईने शेती दिली पण त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते म्हणून मागील वर्षांपासून मुलाच्या सहकार्याने स्वत: शेती करण्यास सुरुवात केली. सुमनबाई यांचे मोठे पुत्र जितेंद्र पाटील यांचे बारावीपर्यंत शिक्षण झालेले पैठण येथे खासगी कंपनीत नोकरीला होते. जितेंद्र पाटील यावर्षी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून आईच्या मदतीला आले. मायलेकरांना शेतीतील अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सहा एकर जमीन, घरात मोजकीच माणसे त्यामुळे त्यांना शेतमजुरांवर भाड्याने आणलेल्या ट्रॅक्टरवर अवलंबून राहावे लागायचे. ट्रॅक्टर वेळेवर मिळायचा नाही त्यामुळे वेळ आणि पैसा जावूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. आपला स्वत:चा ट्रॅक्टर असावा असा विचार मायलेकरांच्या मनात आला पण एवढा पैसा कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला.  

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेती विकासासाठी तसेच शेतकरी कल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनामार्फतउन्नत शेतीसमृध्द शेतकरी अभियानराबविण्यात येत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर घटलेली जमीन धारणा, बैलांची कमी झालेली संख्या, शेती कामासाठी मजुरांची घटलेली संख्या मजूरीचे वाढते दर, पेरणीसाठी मिळणारा कमी कालावधी, पिके आणि फळबागांमध्ये असलेली विविधता यामुळे कृषी यांत्रिकीकरणास चालना देण्याचे शासनाने ठरविले आहे. उन्नत शेतीसमृद्ध शेतकरी अभियान या योजनेचा लाभ श्रीमती सुमनबाई पाटील यांनी घेतला. श्रीमती सुमनबाई पाटील यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजना २०१७१८ मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर खरेदीसाठी सुमनाबई पाटील यांना एक लाख २५ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. शेतीतील लहान मोठी कामे करण्यासाठी रोटॉवेटर, ट्रेलर, नागर, ट्रॉली, कुट्टी मशीन खरेदी केले. जितेंद्र पाटील यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुसऱ्याचे शेत नांगरून देणे, ट्रीलर करून देणे, कुट्टी करून देणे आदी कामे करून देतात यामुळे त्यांना वर्षाकाठी किमान दोन लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. पाटील यांची मुले औरंगाबादला उच्च शिक्षण घेतात. त्यामुळे पाटील मायलेक म्हणतात, होय याच सरकारने दिला आम्हाला मदतीचा हात असे म्हणत राजा विक्रमादित्य बोलायचा थांबला.

राजा, खरं तर मला या गोष्टीशी काही देणेघेणे नाही, मला फक्त तुला बोलते करायचे होते. तुझ्या उत्तरामुळे माझे समाधान झाले पण तु मौन सोडलेस, आता मला जावे लागेल. असे म्हणून वेताळ मोठमोठ्याने हसत प्रेतासह गायब झाला आणि पुन्हा झाडावर लोंबकळू लागला.

Share This
 •  
 • 1K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1K
  Shares

Leave a Reply

MENU