fbpx
Jun 2, 2019
963 Views
4 1

मुख्यमंत्री फेलो – एक नवा पायंडा

Written by

ऑनलाईन टेस्ट घेऊन अर्ज केलेल्या युवक, युवतींची छाननी करण्यात येते. त्यानंतर एक निबंध लिहून ह्या योजनेतील सहभागाबद्दल व प्रशासकीय कामाबद्दल उमेदवारांचे विचार मागवले जातात. त्यातून निवड करून व शेवटी व्यक्तिगत मुलाखतीमधून अशा ‘मुख्यमंत्री फेलो’ मंडळींची निवड करण्यात येते. ह्या फेलोशिपचा कार्यकाळ ११ महिन्यांचा असतो. मुख्यमंत्री कार्यालय, शासनाचे विविध विभाग प्रकल्प, पायाभूत सुविधांच्या अतिमहत्वाच्या प्रकल्पांच्या वॉररूम, जिल्हाकेंद्रे अशा ठिकाणी अशा फेलोची नियुक्ती आजवर करण्यात आली आहे.

Share This
 •  
 • 1.6K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1.6K
  Shares

महाराष्ट्र सरकारने आणि विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुशार पदवीधर तरुणांना महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय कामात एक वर्षे उमेदवारी करण्याची आणि विकासाच्या प्रक्रियेत आपला हातभार लावण्याची संधी दिली आहे. ह्या योजनेचे नाव आहेमुख्यमंत्री फेलो’. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर वर्ष २०१५ मध्ये ही योजना सुरु झाली. गेली चार वर्षे ही योजना सुरु असून आजवर चार बॅचेस मधून, सुमारे २०० तरुणांनी आपली उमेदवारी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. निदान एक वर्षे नोकरी केल्याचा अनुभव असणाऱ्या पदवीधर तरुणाला, ज्याला स्वत:चा वेळ अशा सकारात्मक कामाकरिता देण्याची इच्छा आहे, ह्यामुळे एक संधी मिळत आहे. तारुण्याच्या उत्साहाच्या ऐन भरात असलेल्या, नवे तंत्रज्ञान, इंटरनेट अधिक सहजगत्या वापरणाऱ्या तरुणांची मदत अनेक छोट्यामोठ्या प्रशासकीय कामांचा सतत अथक पाठपुरावा करण्यासाठी, विविध विभागात सुसूत्रीकरण साधूनफाईल हलणेअधिक वेगाने होण्यासाठी प्रशासनाला होत आहे.

ऑनलाईन टेस्ट घेऊन अर्ज केलेल्या युवक, युवतींची छाननी करण्यात येते. त्यानंतर एक निबंध लिहून ह्या योजनेतील सहभागाबद्दल प्रशासकीय कामाबद्दल उमेदवारांचे विचार मागवले जातात. त्यातून निवड करून शेवटी व्यक्तिगत मुलाखतीमधून अशामुख्यमंत्री फेलोमंडळींची निवड करण्यात येते. ह्या फेलोशिपचा कार्यकाळ ११ महिन्यांचा असतो. मुख्यमंत्री कार्यालय, शासनाचे विविध विभाग प्रकल्प, पायाभूत सुविधांच्या अतिमहत्वाच्या प्रकल्पांच्या वॉररूम, जिल्हाकेंद्रे अशा ठिकाणी अशा फेलोची नियुक्ती आजवर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी ह्या फेलो योजनेबद्दल म्हणाले कीविविध शक्यता अजमावून बघणे आलेल्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन सर्व तपशील खणून काढणे ह्या तरुण मंडळींना चांगलेच जमते आहे.”

राज्यसरकारच्या कारभारात काही विषय केंद्र सरकारशी वा केंद्रीय संस्थांशी जोडलेले असतात. असे राज्यकेंद्र संबंधित विषय हे तरुण फेलो चिकाटीने पाठपुरावा करून मार्गी लावतात. उदा मुंबईमधीलबेस्टह्या शहरातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या उपक्रमाला ४० विजेच्या बसेस साठी केंद्राकडून सबसिडी मिळवण्याचे काम होते. त्यात राज्याच्या स्तरावर बेस्ट कडून विविध कागदपत्रांची अर्जांची पूर्तता करून घेणे आणि केंद्र सरकारच्या खात्यात चिकाटीने पाठपुरावा करणे असे दुहेरी आव्हानात्मक काम होते. संबंधितफेलोने ते पार पडले विजेवर चालणाऱ्या बसेस मिळवण्याचा मार्ग सोपा झाला. मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, जलयुक्त शिवार कार्यक्रम अशा विविध खात्यांमध्ये, प्रकल्पांच्या साठी हे तरुण फेलो धडाडीने काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना पहिल्यांदा सुरु केली. त्यानंतर अनेक भाजपा शासित राज्यांनी ह्या योजनेचा स्वीकार केला. आता तर केवळ भाजपा शासितच नव्हे तर दिल्ली, केरळ, आंध्र प्रदेश ह्या राज्यांनीही ही योजना स्वीकारली आहे. स्थानिक तरुणांना राज्यांनाही ह्या योजनेचा लाभ मिळत आहे

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी ह्या योजने बद्दल म्हणाले कीअंगभूत कल्पनाशक्ती, हुशारी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर अनेक फेलो चंद्रपूर जिल्ह्यात चांगले काम केले आहे. चंद्रपूर जिल्ह्याची निवड पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये झाली होती जिथेऑफिसप्रक्रिया राबवण्यात आली जेथे सर्व फाईलचा निपटारा संगणकीकृत रचनेनेच केला जावा अशी योजना आहे. ही योजना कार्यान्वित करताना ह्या तरुण फेलोंची भरपूर मदत झाली. चंद्रपूर बल्लारशहा रेलवे स्टेशन सुशोभित करणे, टाटा ट्रस्ट च्या माध्यमातून LAPTOP बसवलेल्या १० प्रशिक्षण बसेस च्या माध्यमातून जिल्ह्यातील ८५०० हून अधिक तरुणांना दिलेले संगणक प्रशिक्षण अशा विविध कामांत, प्रकल्पांत हे तरुण फेलो त्या जिल्ह्यात चांगले काम करीत आहेत.”

महाराष्ट्रात विविध महानगरात गेल्या काही दशकात सरकारी नोकऱ्यांच्या व्यतिरिक्त चांगल्या खाजगी नोकऱ्यांच्या संधी वाढल्या आहे. त्यामुळे हुशार कर्तृत्ववान तरुणांना खाजगी, कॉर्पोरेट जगतात भरपूर मागणी आहे. आजवर सरकारी कारभाराच्या लालफितीच्यारेप्युटेशनमुळे सरकारी क्षेत्राकडे अनुत्साहाने बघणाऱ्या तरुणांना बदलत्या राजकीय संस्कृतीचा परिचय ह्या निमित्ताने होईल अधिकाधिक प्रामाणिक कर्तृत्ववान तरुण सरकारी नोकरीचा पर्यायही सकारात्मक पणे स्वीकारतील अशी आशा आहे.   

हिरण्य सूर्यवंशी

Share This
 •  
 • 1.6K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1.6K
  Shares

Leave a Reply

MENU