fbpx
Apr 14, 2019
412 Views
1 0

संरक्षण खरेदी आणि मेक इन इंडिया

Written by

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात नव्याने ‘डिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजर’ कार्यवाहीत आल्यानंतर संरक्षण खरेदी मध्ये प्रचंड वेग आला. संरक्षण उत्पादन २०१३-१४ मध्ये रु. ४०००० कोटी इतके होते ते आज रु. ८०००० कोटी इतके वाढले आहे. इतकेच नाही तर गेल्या चार – साडेचार वर्षात संरक्षण उत्पादनातील १०००० पार्ट्स भारतात बनवण्यास सुरुवात झाली. २०१४ च्या आधी ते सर्व आयात करावे लागत होते.

Share This
 •  
 • 220
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  220
  Shares

कारगील युद्धानंतर नव्या पिढीतील लढाऊ विमानांची गरज भारताच्या संरक्षण विषयक तज्ञांच्या लक्षात आली आणि अटलजींच्या काळातच तशा लढाऊ विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरु झाली. पण त्यानंतर आलेल्या सरकारांच्या दहा वर्षांच्या काळात त्या विषयात काहीही प्रगती झाल्यामुळे कारगील युद्धानंतर जवळजवळ वीस वर्षानंतरदेखील भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात नव्या पिढीची मारक क्षमता असलेले एकही विमान समाविष्ट होऊ शकले नाही. २०१४ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने अत्यंत वेगाने निर्णय घेत राफेल विमान खरेदीच्या निर्णयामुळे निदान २०१९ च्या शेवटा पर्यंत तरी राफेल विमानांचा पहिला ताफा भारतीय हवाईदलात सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही तातडीची गरज पूर्ण झाल्यानंतर मात्र ही लढाऊ विमाने भारतात बनवण्यात येणार आहेत

राफेल विमानांच्या खरेदी व्यतिरिक्तही संरक्षण खरेदी विषयात अनेक निर्णय ह्या सरकारने घेतले. अत्याधुनिकअसॉल्ट रायफलची मागणी आर्मीने केली होती. त्या संबंधीचा निर्णय सरकारने केला आणि इंडोरशियन रायफल्स प्रा. लि. ह्या जॉइंट व्हेन्चर कंपनीची स्थापना केली आहे. उत्तर प्रदेशात अमेठी जवळच्या कोरवा नावाच्या गावातएके२०३ह्या अत्याधुनिकअसॉल्ट रायफलच्या निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय ह्या सरकारने घेतला. येत्या तीन वर्षात ही रायफल पूर्णपणे भारतात बनवलेली रायफल असेल

२०१५ मध्ये आर्मीने टाटा मोटर्स ला १२३९हाय मोबिलिटी वेहीकल्स HMV’ ची ऑर्डर दिली. टाटा मोटर्सच्या बरोबरीने अन्य कंपन्याही अशा प्रकारच्या आर्मी उपयोगी वाहनांचे उत्पादन करत आहेत. म्यानमारच्या आर्मीला विशिष्ट प्रशिक्षण शस्त्रास्त्र देण्याचे सहकार्य देखील ह्या सरकारच्या काळात अधिक वेगाने सुरु झाले आहे. ‘धनुषह्या भारतात बनणाऱ्या अत्याधुनिक तोफेच्या उत्पादनाला देखील हिरवा कंदील मिळाला असून ११४ धनुष तोफा बनवण्याची ऑर्डर आर्मीने दिली आहे. विशेष म्हणजे ह्या पूर्वी कारगिल युद्धात गाजलेल्या बोफोर्स तोफांची मारक क्षमता २७ किमी होती तर धनुष ची क्षमता ३९ किमी आहे.  

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात नव्यानेडिफेन्स प्रोक्युरमेंट प्रोसिजरकार्यवाहीत आल्यानंतर संरक्षण खरेदी मध्ये प्रचंड वेग आला. संरक्षण उत्पादन २०१३१४ मध्ये रु. ४०००० कोटी इतके होते ते आज रु. ८०००० कोटी इतके वाढले आहे. इतकेच नाही तर गेल्या चारसाडेचार वर्षात संरक्षण उत्पादनातील १०००० पार्ट्स भारतात बनवण्यास सुरुवात झाली. २०१४ च्या आधी ते सर्व आयात करावे लागत होते. अशीच गोष्ट आहे अत्यंत उंचीवरील युद्धक्षेत्रात वापरण्यासाठी सैनिकांना लागणारे वस्त्रप्रावरणांची. २०१३१४ पर्यंत हे कपडे आयात करावे लागत होते आता त्यापैकी जवळ जवळ ८०% कपडे भारतातच बनत आहेत.हिंदुस्तान एरोनॉटिक्स ह्या भारत सरकारच्या कंपनीने बनवलेल्यातेजसह्या लाईट काँबॅट एअरक्राफ्ट ला हिरवा कंदील मिळाला असून भारतीय हवाई दलासाठी अशी १२३ विमाने बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे.

भारतीय नौदलाने तरमेक इन इंडियाच्या विषयात विशेष आघाडी घेतली आहे. सध्या नौदलाने विदेशी उत्पादकांना पाणबुड्या बनवण्याच्या ऑर्डर दिल्या आहेत. पणमेक इन इंडियाच्या विविध उत्पादनांची गती बघता अशा प्रकारे विदेशी कंपनांना दिलेली ही शेवटची ऑर्डर ठरेल. ह्या पुढील पाणबुड्यांची निर्मिती भारतातील उत्पादन केंद्रातच होईल. सध्या एका एअरक्राफ्ट कॅरियरची बांधणी भारतीय गोदीमध्ये सुरु आहे. तीन कॅडेट ट्रेनिंग शिप्सची बांधणी भारतात सुरु आहे. भारतातील विविध शिपयार्ड मध्ये भारतीय नौदलाच्या ऑर्डर्स दीड लाख कोटी रुपयांच्या असाव्यात. नौदलाच्या जहाज बांधणी साठी लागणाऱ्या पोलादाची ९०% गरज भारतातूनच भागवली जाते. संरक्षण संशोधन करणाऱ्या संस्था स्टील अथोरिटी ऑफ इंडिया यांनी केलेल्या धातुशास्त्र विषयात केलेल्या संशोधनामुळे हे शक्य झाले आहे. नौदलाकडे असलेल्या शस्त्रास्त्रांच्या भात्यातही चांगलीच भर पडणार आहे. ‘निर्भयनावाचे १००० किमी पल्ल्याचे जमिनीवर मारा करणारे क्रूझ मिसाईल, ब्राह्मोस – 2 हे ३०० किमी पल्ल्याचे जहाज विरोधी मिसाईल वगैरे अस्त्रांची निर्मिती वेगाने सुरु आहे लवकरच ते नौदलाच्या ताब्यात येतील. भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी ह्या सर्व प्रयत्नांचे महत्व फार मोठे आहे.

Share This
 •  
 • 220
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  220
  Shares

Leave a Reply

MENU