fbpx
Apr 12, 2019
589 Views
5 3

इलेक्शन-विलेक्शन

Written by

देशातील पहिल्या निवडणुकीचा कालावधी होता 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 अशा चार महिन्यांचा. लोकसभेच्या 489 जागांसाठी 401 मतदारसंघात निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी 86 मतदारसंघात दोन जणांची खासदार म्हणून निवड करण्यात आली. सर्वसामान्य वर्गातील एक आणि एससी,एसटी समुदायातील एक अशा दोन प्रतिनिधींची निवड करण्यात आली. (बहुजागांची ही पद्धत 1960 नंतर बंद करण्यात आली) उत्तर बंगाल या मतदारसंघातून तीन खासदारांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनसंघ यासाह 53 पक्ष मैदानात उतरले होते.

Share This
 •  
 • 257
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  257
  Shares

प्रचंड उष्मा आणि निवडणूक यामुळे देशातील वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. कालच पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. 19 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात हे मतदान घेतले जाईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुमारे 45 दिवस चालेल. तुम्हाला माहित आहे देशातील पहिली निवडणूक प्रक्रिया किती दिवस सुरु होतीतब्बल चार महिने.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर चार वर्षांनी म्हणजे 1951-52 मध्ये  देशातील पहिल्या वहिल्या लोकसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने जगभराचे लक्ष या निवडणुकांकडे असणे तसे स्वाभाविकच. ही निवडणूक 68 टप्प्यात झाली होती. मतदानाबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यापासून त्यांना मतदान प्रक्रिया समजवण्याचे मोठे आव्हान होते. त्यावेळी मतदारांच्या सोयीसाठी प्रत्येक पक्षासाठी स्वतंत्र मतपेटी ठेवण्यात आली होती. त्यासाठी दोन कोटीपेक्षा जास्त लोखंडी पेट्या बनवण्यात आल्या होत्या. तर सुमारे 62 कोटी मतपत्रिका छापण्यात आल्या. 36 कोटी लोकसंख्येमध्ये 17.3 कोटी मतदार होते. त्यातील 45.7 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. देशातील पहिले मत 25 आॅक्टोबर 1951 रोजी हिमाचल प्रदेशातील चिनी या मतदान केंद्रावर नोंदविण्यात आले. सध्या भारतात एकूण 90 कोटी मतदार आहेत. युरोपातील एकूण लोकसंख्येपेक्षा हा आकडा सुमारे 15 कोटींनी जास्त आहे. कालच्या पहिल्या टप्प्यातील मतारांची संख्याही रशियाच्या लोकसंख्य़ेपेक्षा जास्त आहे. असो.

देशातील पहिल्या निवडणुकीचा कालावधी होता 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 अशा चार महिन्यांचा. लोकसभेच्या 489 जागांसाठी 401 मतदारसंघात निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी 86 मतदारसंघात दोन जणांची खासदार म्हणून निवड करण्यात आली. सर्वसामान्य वर्गातील एक आणि एससी,एसटी समुदायातील एक अशा दोन प्रतिनिधींची निवड करण्यात आली. (बहुजागांची ही पद्धत 1960 नंतर बंद करण्यात आली) उत्तर बंगाल या मतदारसंघातून तीन खासदारांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनसंघ यासाह 53 पक्ष मैदानात उतरले होते

या पहिल्यावहिल्या निवडणुकीत 53 राजकीय पक्ष मैदानात उतरले होते. त्यापैकी प्रमुख 15 पक्षांमधील काॅंग्रेस, कम्युनिस्ट याच्याप्रमाणेच शिरोमणी अकाल दल आणि शेतकरी कामगार पक्ष हे पक्ष आजपर्यंत आपले अस्तित्व टिकवून आहेत. या निवडणुकीला खर्च किती आला माहित आहे… 14 कोटी 40 लाख रूपये. या पहिल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतदान होण्याचा प्रश्नच नव्हता. कारण त्यावेळी महाराष्ट्राचा जन्मच झाला नव्हता. सध्या अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्राचा बहुतांश भाग मुंबई इलाख्यात समाविष्ट होता. मुंबई इलाखा किंवा बाॅम्बे प्रेसिडेन्सी हा ब्रिटिश भारतातील प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, तसेच वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रान्त या प्रदेशांचा मुंबई इलाख्यात समावेश होता. मुंबई इलाख्याची राजधानी मुंबई ही होती.भारत स्वतंत्र झाल्यावर १९६० सालापर्यंत अनुक्रमे बाळ गंगाधर खेर आणि मोरारजी देसाई हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुंबई प्रांताचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्याची निर्मिती झालीकोकण, खानदेश, मध्य प्रांतातील विदर्भ वर्‍हाड आणि हैदराबाद संस्थानातील मराठवाडा यांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्यामुळे लोकसभेसाठी महाराष्ट्र राज्यात पहिली निवचणूक झाली ती 1962मध्ये

1951ला झालेल्या पहिल्या निवडणुकीत मुंबई इलाख्यातील सध्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या एकूण 19 मतदारसंघात मतदान घेण्यात आले. त्यावेळी सुमारे 52 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 1957मध्ये झालेल्या दुसऱ्या सोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघांचा आकडा 37वर गेला. त्यामुळे मतदारांची संख्याही लाखभराने वाढली. आणि मतदानाच्या टक्केवारीतही दोन टक्क्यांनी वाढ झाली. पुढल्या भागात आपण महाराष्ट्र निर्मीतीनंतरच्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊ.

सर्चशास्त्री

Share This
 •  
 • 257
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  257
  Shares
Article Tags:
· ·
Article Categories:
KOMB

Leave a Reply

MENU