fbpx
Jun 28, 2019
277 Views
0 0

जलसंचय…पाण्याचे बचत खाते !

Written by

अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे राज्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम होतो. या बाबी राज्याच्या विकासात एक आव्हान ठरत आहेत. राज्यात गेल्या चार दशकात पुरेशा पाण्याअभावी कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान एकात्मिक पध्दतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे.

Share This
 •  
 • 572
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  572
  Shares

संचय म्हणजे कायएकत्रित जमा करणे, गोळा करणे, साठविणे किंवा संग्रह करणे. तर कोणत्याही वस्तूचा, माहितीचा किंवा ज्ञानाचा संचय आपण का करतो? त्याचं उत्तर आपल्याला अगदी एका शब्दातही देता येईल. भविष्यासाठी. मग तो धान्याचा संचय असोमाणसांचा असो किंवा अगदी पैसा असो अथवा पाणीसुद्धाआपत्कालिन परिस्थितीत जगणे सुकर होण्यासाठी म्हणजेच भविष्याची तजवीज म्हणून आपण संचय करित असतो. जलसंचय हा त्याचाच एक भाग आहे. आपण घरात नाही का, कळशा , पिंप अथवा बादलीत पाणी भरून ठेवतो. कशासाठीतर दुसऱ्या दिवशी नळाला पाणी आले नाही तरत्यासाठी केलेली ती तजविज असते. एकवेळ धनसंचय केला नाही तरी चालेल, पण प्रत्येकाने भविष्यासाठी जलसंचय केलाच पाहिजे असे दिवस आता आले आहेत.  

राज्याच्या काही भागात दर दोन वर्षांनी यानात्या कारणांनी निर्माण होणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीजलयुक्त शिवारअभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतलाया नाविण्यपूर्ण योजनेनुसार जलसंधारणांतर्गत सर्वसमावेशक उपाययोजनाद्वारे एकात्मिक पद्धतीने शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देणे हाच या योजनेचा खरा उद्देश. याद्वारे महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा केलेला निर्धार खऱ्या अर्थाने क्रांतिकारीच नाही का

2014-15 मध्ये भूजल पातळीत 2 मीटरपेक्षा जास्त घट झालेल्या 188 तालुक्यातील 2 हजार 234 गावे तसेच शासनाने टंचाई परिस्थिती जाहीर केलेल्या 22 जिल्ह्यातील 19 हजार 59 गावांमध्ये  ‘जलयुक्त शिवारअभियान प्राधान्याने राबविण्यास सुरुवात  करण्यात आली. भविष्यात राज्याच्या उर्वरित भागात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला आहे

अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे राज्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी क्षेत्रावर त्याचा विपरित परिणाम होतो. या बाबी राज्याच्या विकासात एक आव्हान ठरत आहेत. राज्यात गेल्या चार दशकात पुरेशा पाण्याअभावी कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असणारी ही परिस्थिती बदलण्यासाठी  ‘जलयुक्त शिवारअभियान  एकात्मिक पध्दतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात पाणी अडविणे आणि जिरविण्यासाठी जलसंधारणाच्या राबविलेल्या विविध प्रणालीमुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मदत होत आहे. असे असूनही आपल्याला दुष्काळाची झळ का बसत आहे, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पण त्याचे दृष्य परिणाम दिसण्यासाठी काही अवधी तर नक्कीच लागले. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्याही परिस्थितीत टंचाईग्रस्त गावांना टॅंकरच्या माध्यमातून करावा लागणारा पाणी पुरवठा उशिरा सुरु झाला. म्हणजे तशी गरजच गेल्या काही वर्षांच्या तुलनेत उशिरा निर्माण झाली. हे या योजनेचे फलितच म्हणायला हवे.

राज्य शासनाच्या या योजनेला लोकसहभागाचे फारमोठे पाठबळ लाभल्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील फारमोठी लोकचळवळ असेही त्याचे वर्णन केले जात आहे. जी कामे पूर्वी निविदा काढून लाखो रुपये खर्चून करण्यात येत होती ती कामे लोकसहभागामुळे काही हजारात होऊ लागली.

जलयुक्त शिवार अभियानात राज्यभरामध्ये 2015-16पासून आतापर्यंत 11 हजार 494 गावे निवडण्यात आली. त्यामध्ये 3 लाख 46 हजार 179 कामे पूर्ण करण्यात आली. गाळ काढणे आणि रुंदीकरणाची शासनाकडून 12 हजार 915 तर लोकसहभागातून आठ हजार 364 कामे करण्यात आली. शासनाच्या सहभागातून 731 लाख घनफुट तर लोकसहभागातून 822 लाख घनफुट इतक्या प्रचंड प्रमाणात गाळ काढण्यात आला. रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या शासनामार्फत करण्यात आलेल्या कामांची किंमत 436 कोटी रुपये तर लोकसहभागातून झालेल्या कामांची किंमत 552 कोटी रुपये इतकी आहे.

जलयुक्त शिवार अभियानासाठी तीन हजार 475 कोटी रुपयांता निधी मंजूर करण्यात आला. या अभियानामुळे आतापर्यंत 11 लाख 82 हजार 230 टीएमसी इतकी पाणीसाठवण क्षमता निर्माण करण्यात आला आहे. पूर्वी वर्षाला साधारणपणे 15 हजार विहिरी बांधल्या जात होत्या. ती संख्या आता 40 हजारांवर गेली आहे.

ही झाली केवळ आकडेवारी पण त्याचे दृश्य परिणामही हळूहळू दिसू लागले आहेत. महाराष्ट्रातील अनेक गावांमधील शेतांमध्ये पाण्याच्या बॅंका निर्माण होत आहेत. दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला भविष्यात या पाण्याच्या बॅंकाच तर तारणार आहेत.

सर्चशास्त्री

Share This
 •  
 • 572
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  572
  Shares
Article Categories:
KOMB

Leave a Reply

MENU