fbpx
Jul 14, 2019
612 Views
0 0

‘जलयुक्त शिवार’ चे घवघवीत यश

Written by

जलयुक्त शिवार योजनेचे हे चौथे वर्ष आहे. ह्या चारही वर्षांचा ठोकताळा मांडला तरजलयुक्त शिवारयोजनेमुळे विविध जिल्ह्यात घडणारे सकारात्मक बदल लक्षात येतील. महाराष्ट्र राज्याच्या जलसंधारण खात्याचे आकडे सांगायचे तर जवळजवळ १६,५०० गावात सुमारे पाच लाख जलसंधारणाची कामे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत करण्यात आली. ह्या पैकी सुमारे १२००० गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली. ह्या गावांच्या परिसरात गेल्या वर्षी सरासरीच्या केवळ ७०% पाउस झाला होता. तरीही उन्हाळ्याच्या शेवटच्या काळात टँकर पिण्याच्या पाण्यासाठी पाठवावे लागले. २०१४१५ च्या तुलनेत ती संख्या केवळ २०% किंवा अजूनही कमी होती हे लक्षात घ्यायला हवे

लोकांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड सहभाग हे जलयुक्त शिवार योजनेचे वैशिष्ट्य आहे. किंबहुना हेच ही योजना यशस्वी होण्याचे कारणही आहे. इतक्या भव्य योजनेसाठी गेल्या तीन वर्षात सुमारे ७५०० कोटी रुपये ह्या कामांवर शासनाने खर्च केले. शिवाय ६३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खाजगी देणगीदार, कॉर्पोरेट यांच्या सामाजिक दायित्व निधी (CSR) मधून उभी राहिली. जलसंधारण ह्या विषयात इतक्या मोठ्या प्रमाणावर खाजगी पुढाकारातून निधी उभारला जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. शिवाय जलयुक्त शिवारची कामे झालेल्या सर्व गावातून स्थानिक गावकऱ्यांनी राज्यातील विविध गैर सरकारी संस्थांनी प्रत्यक्ष श्रमदानांत सहभाग घेतला. अशा प्रकारे मोठ्या दरवर्षी वाढत्या लोकसहभागामुळे ही योजना ह्या योजने अंतर्गत होणारी कामे ही आपली कामे आहेत, आपली जबाबदारी आहे असे लोकांना वाटले हे देखील ह्या योजनेचे यश म्हणयला हवे

ही योजना सुरु होण्या पूर्वी सरकारी अहवालानुसारच हजारो कोटी रुपये खर्च होऊनही सिंचन क्षेत्रात नाममात्र वाढ झाली होती हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यभरात २४  लाख टीएमसी इतका जलसाठा करण्याची क्षमता निर्माण झाली. ह्या योजनेच्या आधीची सिंचन विभागाची स्थिती बघता हे यश लक्षणीय आहे. शेततळे, नाला खोलीकरण, त्यातील गाळ काढणे, नाला दुरुस्त करणे, विविध प्रकारच्या साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, तलावातील गाळ काढणेदुरुस्ती, ओढानालेकालवे जोडण्याचे प्रकल्प, सिंचन विहीर बंधने, कंटूर ट्रेंचेस, कंपार्टमेंट बंडिंग अशा विविध विकेंद्रित उपक्रमांच्या मुळे राज्यभर विकेंद्रित जालासाठा निर्माण झाला.    

महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचे उदाहरण बघूया. एकेकाळी डाळींचा पुरवठा करणारी भारताची क्र. ची बाजारपेठ असणारा जिल्हा होता लातूर. पण अवर्षण, भूजलपातळी खालीखाली जाणे, पीक पद्धतीमधील असमतोल अशा विविध कारणांमुळे हा जिल्हा दुष्काळ ग्रस्त झाला. उन्हाळ्यात शेतीच्यापिण्याच्या पाण्याची टंचाई, गुरांसाठी चाऱ्याची टंचाई ही नेहमीचीच गोष्ट होऊन बसली. काही काळापूर्वी ऐन उन्हाळ्यात अन्य जिल्ह्यातून पाण्याचे टँकर भरलेली ट्रेन लातूरला पाठवायला लागली होती. पण गेल्या काही वर्षात जलयुक्त शिवार योजनेतून वर उल्लेखलेली विविध कामे करण्यात आली. जिल्ह्यातील अनेक गावात त्यामुळे भूजल पातळी वाढली. जिल्ह्याची सरासरी वाढ .१५ मीटर झाली तर निलंगा तालुक्यात ही वाढ . मीटरने झाली. अनेक शेतात ठिबकसिंचन, तुषारसिंचन अशा गोष्टी वापरून पाण्याची बचत शक्य झाली. ज्वारी, हळद, हरभरा, तूर, सोयाबीन अशा पिकांना जीवदान मिळाले. अनेक शेतकऱ्यांनी दोन तर काही जणांनी तीन पिके घेतली. पहिल्या दोन वर्षांतच लातूर जिल्ह्यातच ४०००० टीसीएम इतकी जलसाठा क्षमता निर्माण झाली तर जवळ जवळ ५०% गावे जलस्वयंपूर्ण झाली

यंदा लातूर जिल्ह्याचे कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. एक जुलै ते ३० सप्टेंबर ह्या कालावधीत ते पूर्ण करायचे आहे. स्वत:ची तहान भागल्याशिवाय असे भव्य उद्दिष्ट कोणी ठरवू शकणार नाही!

हिरण्य सूर्यवंशी

Share This
 •  
 • 1.5K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1.5K
  Shares

Leave a Reply

MENU