fbpx
Jul 28, 2019
365 Views
0 0

मुद्रा योजना: महाराष्ट्रातील यशोगाथा

Written by

महाराष्ट्र राज्यात अनेक उद्योजकांना ह्या योजनेचा लाभ झाला आहे आणि त्यांनी आपले उद्योग नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहेत. त्यांच्या आकारानुसार शिशु, किशोर व तरुण अशा तीन श्रेणीमध्ये कर्जांचे प्रकार केले आहेत. त्यातील काही यशस्वी उदाहरणे…

Share This
 •  
 • 172
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  172
  Shares

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळातच केंद्र सरकारने मुद्रा योजना घोषित केली. योजना अशी आहे की आजवर कर्जव्यवस्थेच्या/ पतव्यवस्थेच्या बाहेर असणाऱ्या छोट्या छोट्या उद्योगांना अगदी मोजकी अत्यावश्यक कागदपत्रे करून सार्वजनिक बँकेच्या मार्फत छोटी कर्जे मिळवीत त्यांना व्यवसाय वाढीसाठी त्या कर्जांचा उपयोग व्हावा. एक प्रकारे ‘funding the unfunded’ अशा स्वरूपाचे हे धोरण होते. महाराष्ट्र राज्यात अनेक उद्योजकांना ह्या योजनेचा लाभ झाला आहे आणि त्यांनी आपले उद्योग नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहेत. त्यांच्या आकारानुसार शिशु, किशोर तरुण अशा तीन श्रेणीमध्ये कर्जांचे प्रकार केले आहेत. त्यातील काही यशस्वी उदाहरणेयशोगाथा शेअर करत आहे.

देशी टॉइज’ – ठाणे येथील महिला उद्योजक श्रीमती चित्रा वाघ यांनी देसीटॉइज नावाचा छोटा व्यवसाय २०१२ मध्ये सुरु केला. लहान मुलांसाठी पारंपारिक खेळणी, बुद्धीलाक्षमता वाढीला चालना देणारी खेळणी तयार करण्याचा हा व्यवसाय आहे. पारंपारिक सापशिडी, लगोरी, भोवरा, भातुकलीची भांडी अशा खेळांपासून ते डोके चालवायला लागणारे, विज्ञानाची सूत्रे सोप्या खेळातून सांगणे असे अनेक खेळांचे प्रकार त्यांनी बनवले आहेत. व्यवसाय बाल्यावस्थेत असतानाच २०१४ मध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. कालांतराने छोट्या व्यावसायिकांसाठी असणारीमुद्राकर्ज योजना जाहीर झाली.

चित्रा वाघ ह्या IIM कलकत्ता येथून MBA झालेल्या आहेत. हा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्यांनी रीटेल क्षेत्रात फ्युचर ग्रुप, शॉपर्सस्टॉप अशा कंपन्यांत वर्षे काम केले आहे. त्यांनी एका स्टॉल वजा जागेतून सुरुवातीला ही खेळणी विकायला सुरुवात केली कालांतराने एक दुकान घेऊन तिथून विक्री करण्यास सुरुवात केली. मुद्रा योजनेची माहिती कळताच त्यांनी स्थानिक स्टेट बॅंकेच्या शाखेत ह्या योजनेअंतर्गत अर्ज केला. स्थानिक बँक अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकरणाची वेगाने छाननी करून पाच लाख रुपयाचे कर्ज मंजूर केले. कालांतराने ती लिमिट वाढवून साडे सात लाख करण्यात आली. ह्या कर्जामुळे त्यांना आपला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने, विशेषत: विक्री व्यवस्था अद्ययावत करण्यासाठी महत्वाची मदत झाली. आज त्यांची ५० लाख रुपयांहून अधिकची विक्री आहे. त्यांच्या कंपनीच्या वेबसाईट वरून ऑनलाईन खरेदीची आज सोय आहे. विविध ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांमार्फतही (उदा: Amazon) देसीटॉइजच्या खेळण्यांची विक्री होते आहे.

नागपूर येथील श्रीमती उषा अग्गासे यांचे पती सिक्युरिटी गार्ड आहेत. उषाताईंना संसारासाठी हातभार लावण्यासाठी शिवणकाम करण्याची इच्छा होती. अलाहाबाद बँकेच्या स्थानिक शाखेने त्यांना मुद्रा योजने अंतर्गत शिवणयंत्र घेण्यासाठी कर्ज दिले. त्यांनी शिवणयंत्र खरेदी केले स्थानिक महिलांचे कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरु केला. आज त्या महिन्याला ४००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवून आपल्या संसाराला हातभार लावत आहेत.

आजपर्यंत देशभरात (म्हणजे १० जूनच्या आकडेवारी पर्यंत) १८ कोटी ८८ लाख लोकांना मुद्रा कर्जाचे वाटप झाले आहे. आजवर कुठल्याही पतरचनेशी जोडलेल्या, पहिल्यांदाच अधिकृत कर्ज घेणाऱ्या जवळ जवळ . कोटींहून अधिक लोकांनी ह्या योजनेचा पहिल्यांदाच लाभ घेतला आहे.

Share This
 •  
 • 172
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  172
  Shares

Leave a Reply

MENU