fbpx
Jul 25, 2019
446 Views
1 0

मुंबईतील भूमिगत आश्चर्य

Written by

सध्या मुंबईत प्रवास करताना असंख्य ठिकाणी मेट्रोच्या कामामुळे आपल्याला त्रास होतो पण एक गोष्ट आपल्याला दिसत नाही ती म्हणजे जमिनीखाली मेट्रो ३ प्रकल्पाचे काम धडाक्याने सुरू आहे. ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.आणि येत्या दोन अडीच वर्षांत ही लाइन सुरू होईल असा अंदाज आहे.

Share This
 •  
 • 325
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  325
  Shares

मुंबईची लोकसंख्या आणि वाहतूक समस्या हे मोठे जटील प्रश्न गेली कित्येक वर्षे सरकार आणि महानगरपालिका यांची डोकेदुखी होऊन बसले आहेत.उत्तर मुंबईतून कर्मचाऱ्यांचे आणि व्यावसायिकांचे लोंढेच्या लोंढे दक्षिण मुंबईत कामासाठी जात असत,अजूनही जातात.गेल्या सुमारे १०१५ वर्षांत परळ, बीकेसी,पवई,अंधेरी,मालाड अशा अनेक ठिकाणी कमर्शियल,फायनान्शियल बिझनेस सेंटर्स निर्माण झाली आहेत. त्यामुळे ही गर्दी थोडीशी विखुरली गेली आहे. तरीसुद्धा हे प्रश्न आहेत ते आहेतच.

मुंबईचा विस्तार उत्तर दक्षिण असा आहे. रेल्वे लाइन्स आणि महत्वाचे रस्ते यांच्यावर खूप ताण पडतो. मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचे ज्यावेळी ठरवण्यात आले त्यावेळी उत्तर दक्षिण असा शहर आणि उपनगर यांचा जोडणारा एक मेट्रो रूट असावा असा विचार झाला आणि कुलाबा ते वांद्रे असा एक मार्ग असावा असे सुचवण्यात आले. हा मार्ग पुढे सीप्झ पर्यंत वाढवण्यात आला.

राजकीय फायदा उठवण्यासाठी २०१४ साली आचारसंहिता लागण्याच्या आधी घाईघाईने अंधेरी येथे आघाडी सरकारने भूमिपूजन उरकून घेतले. परंतु या मार्गाला खऱ्याअर्थाने सुरुवात झाली ती राज्यात सत्तापालट झाल्यानंतरच.

हा मार्ग मुंबई शहरातील अत्यंत गजबजलेल्या ,दाटीवाटीच्या भागातून जात असल्याने मेट्रो ब्रिज बांधणे अशक्य होते. म्हणून २७ स्टेशन्स असलेल्या या मेट्रो लाईन मध्ये फक्त एकच स्टेशन जमिनीवर आहे बाकी सर्व २६ अंडरग्राऊंड आहेत.हा मार्ग पूर्णपणे अंडरग्राऊंड आहे.अतिशय कल्पक रीतीने या रूटची आखणी करण्यात आली आहे.

सेंट्रल रेल्वेचे सीएसटी, वेस्टर्न रेल्वेची ग्रॅण्टरोड,मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी,दादर येथे इंटरचेंजेबिलिटी दिली आहे.महालक्ष्मी येथे मोनो रेल  तर मेट्रो च्या स्टेशन्सना इंटरचेंजेबिलिटी देण्यात आली आहे. शिवाय बिकेसी येथे बुलेट ट्रेन टर्मिनल असणार आहे.

सध्या मुंबईत प्रवास करताना असंख्य ठिकाणी मेट्रोच्या कामामुळे आपल्याला त्रास होतो पण एक गोष्ट आपल्याला दिसत नाही ती म्हणजे जमिनीखाली मेट्रो   प्रकल्पाचे काम धडाक्याने सुरू आहे. ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.आणि येत्या दोन अडीच वर्षांत ही लाइन सुरू होईल असा अंदाज आहे.

मुंबई एअरपोर्टजवळ ओरिजनल डिझाइनमध्ये प्रवाशांना उतरून इंटरचेंज करावे लागणार होते.त्यात मोठी गैरसोय होणार होती परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये दुरुस्ती सुचवली. त्यानुसार संबंधित कंपनीच्या लोकांनी डिझाइन बदलले.प्रवाशांची त्रासातून मुक्तता होणार आहे.

धारावी ते बिकेसी हा मार्ग मिठी नदीखालून जाणार आहे.काळबादेवी, गिरगाव,सिद्धीविनायक,बिकेसी,कलिना,अंधेरी एमआयडीसी असे आतापर्यंत रेल्वे वाहतुकीपासून वंचित असलेले भाग जोडले जातील आणि जनतेची मोठी सोय होईल

सेंट्रल,वेस्टर्न आणि हार्बर या मुंबईच्या लाईफ लाईन्स समजल्या जातात. मेट्रो ही यात अत्याधुनिक, आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि पावसाच्या नैसर्गिक कोपापासून मुक्त अशी नवीन लाईफलाईन असेल. सर्व मुंबईकर तिची आतुरतेने वाट बघत आहेत.

आनंद विश्वनाथन

Share This
 •  
 • 325
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  325
  Shares

Leave a Reply

MENU