fbpx
Apr 11, 2019
655 Views
9 0

ओपिनियन पोल्स:अंदाजाची खात्री की रतन खत्री

Written by

यंदा मतदारांच्या संख्येत ७ कोटींची वाढ झालेली आहे आणि जर मतदानाची टक्केवारी ७०% च्या वर गेली तर पुन्हा हे सगळे अंदाज धुळीस मिळून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले दिसेल.

जर भाजपला स्वतःला स्पष्ट बहुमत मिळवायचे असेल तर प्रत्येक बूथ प्रमुखाने त्यांच्या बूथवर ८०% मतदान होईल असे प्रयत्न केले तर मोठा विजय निश्चित आहे.

Share This
 •  
 • 203
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  203
  Shares

आजपासून लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होत आहे. सात टप्प्यांमधील ही निवडणूक देशासाठी खूप महत्त्वाची आहे.निवडणूक जाहीर झाली की ओपिनियन पोल्स येऊ लागतात. अनेक एजन्सीज सर्व्हे कंडक्ट करतात आणि त्यांचे रिझल्ट वेगवेगळ्या चॅनेल्सवर जाहीर होतात. काही एजन्सीज स्वतःच्या वेबसाइटवर ती किंवा ट्विटरवरही पब्लिश करतात

आपल्या देशात भविष्याला मानणारे बरेच लोक आहेत.उद्या  काय घडणार आहे  ते आजच कळले तर बरे असे सगळ्यांनाच वाटते. ओपिनियन पोल्सचे पण तसेच आहेज्योतिषी पत्रिका बघतो ,चेहरा बघतो,हात बघतो आणि भविष्यात काय घडणार आहे ते सांगतो. ओपिनियन पोलवाल्यांचे अंदाज  सॅम्पलिंग वरती अवलंबून असतात. शास्त्रोक्त असतात असे समजले जाते

जेव्हा एखादा पोल  प्रसिद्ध होतो तेंव्हा सॅम्पल साईझ सांगितला जातो. मग आपण आश्चर्य व्यक्त करतो की जवळपास ९० कोटी मतदार असलेल्या देशात काही हजार किंवा लाख लोकांना भेटून अंदाज व्यक्त केला जातो. यात आकड्याला महत्व. मग त्याला काही शास्त्रोक्त आधार आहे की रतन खत्री काढायचा तसा आकडा आहे

 ज्या लोकांची निवड सॅम्पल म्हणून केलेली असते ते निवडण्याचे एक शास्त्र आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. स्टॅटिस्टिक्समधे ,मार्केट रिसर्चमध्ये रॅन्डम सॅंपल ही एक कल्पना आहे. कोणताही विशिष्ट विचार करता एखाद्या माणसाची निवड करणे याला रॅंडम सिलेक्शन म्हणतात. पण आपल्याला जो रिझल्ट यायला हवा तशा दृष्टीने जर तुम्ही लोकांची निवड केली असेल तर त्याला बायस्ड सॅम्पलिंग म्हणतात. अशावेळी सर्व्हे फसतो आणि विश्वासार्हता लयास जाते.

प्रत्येक मतदारसंघाचा चेहरामोहरा वेगळा असतो. जात,धर्म, पंथ, भाषा,शहरीग्रामीण,सुखवस्तूगरीब अशा अनेक प्रकारे तो बनलेला असतो. प्रातिनिधिक मतदारसंघ कोणते हे ठरविण्यासाठी ही डेमोग्राफी समजून घेणे महत्त्वाचे असते. सर्वात आधी मतदारसंघ निवडला जातो. त्यानंतर त्याचा उपविभाग म्हणजेच त्या सीटअंतर्गत येणरा  विधानसभा मतदारसंघ आणि त्यानंतर बूथ असे सिलेक्शन केले जाते. ज्या एजन्सीज हा सर्व्हे  घेतात त्यांना सॅम्पलिंग टेक्निक अवगत असते.म्हणजे आपण असे समजायला हरकत नाही.

सर्व्हेचे रिझल्ट्स दोन प्रकारे सांगितले जातात. कोणाला किती टक्के मतदान होणार याचा अंदाज आणि कोणाला किती सीट्स मिळणार याचा अंदाज.परंतु  मतदानाच्या टक्केवारीवरून सीट किती मिळणार याचा अंदाज बांधणे हे खूप कठीण असते. हे करणारे लोक वेगळे असतात.प्रत्येकाचे स्वतःचे एक वेगळे मॉडेल असते. त्यानुसार ही टक्केवारी सीट्समध्ये कन्व्हर्ट केली जाते.

या पोल्स मधून ठोस असे कधीही हाती लागत नाही. पण  साधारणपणे एक गोष्ट लक्षात येते की देशात कोणाच्या बाजूने वारे वाहत आहे.कोणाला किती सीट्स मिळणार आहेत याचा अचूक अंदाज बांधणे केवळ अशक्य आहे

बरेच वेळा सर्व्हेमध्ये जे आढळून येते ते चॅनेल्सना सोयीचे  नसते आणि म्हणून प्रत्यक्ष सर्व्हे दाखवताना चॅनलची मॅनेजमेंट आकडय़ांमध्ये फेरफार करू शकते. असे घडलेले आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांची बोलताना असे जाणवले की जवळपास वीस पंचवीस मोठ्या एजन्सीज असतील तर  त्यातील तीन किंवा चार एजन्सीज प्रामाणिक असून त्या स्वतःच्या आकडेवारीला हात लावू देत नाहीत. जसे आहे तसेच दाखवा ही त्यांची अट असते.

फ्लोटिंग व्होटर्सची संख्या भारतामध्ये खूप असते. कोणाला मतदान करायचे हा निर्णय अगदी बूथवर जाईपर्यंत नक्की झालेला नसतो. सर्वसाधारणपणे हे मतदार ज्या दिशेला हवा आहे त्या पक्षाला मत देऊन मोकळे होतात. दुसरे म्हणजे आपले मत बदलण्यासाठी देशातील मतदार प्रसिद्ध आहेत. म्हणजे ओपिनियन पोल घेतला तेव्हा ज्याला मतदान करणार असे सांगितले तो निर्णय प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बदलतात.ही व्होलॅटॅलिटी भारतात खूप मोठी आहे.

एक्झिट पोल म्हणजे मतदान करून आलेल्या मतदाराला विचारले जाते हे सर्वजण जाणताच. मतदान हे गुप्त असते म्हणून अनेक लोक खरे उत्तर द्यायला नकार देतात. मतदान आटोपून बाहेर आल्यानंतर मतदार फार वेळ प्रश्नांची उत्तर द्यायला उत्सुक असेलच असे नसते.आणि तो मतदार रॅंडम सॅम्पल आहे याची शाश्वती देता येत नाही.म्हणून अनेकवेळा एक्झिट पोलचे अंदाजही चुकू शकतात. पण यावर नियंत्रण ठेवले तर एक्झिट पोलमध्ये तटस्थ मतदारांचा टक्का नसल्यामुळे ते जास्त अचूक ठरू शकतात.

काही एजन्सीज एक्झिट पोल करता पोस्ट पोल सर्व्हे करतात.याचा अर्थ मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मतदारांच्या घरी जाऊन हा सर्व्हे केला जातो. त्यामध्ये सॅम्पल रँडम आहे हे नक्की असते.

काही लोक असे आहेत ज्यांचा गवगवा फक्त सोशल मीडियावर झालेला आहे . कारण त्यांना कोणी चॅनेलवर बोलावत नाही.त्यांचे प्रतिनिधी जवळपास तीनशे साडेतीनशे मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचार होत असताना देशाचा मूड ट्रॅक करत असतात. लाईव्ह ट्रॅकर सिस्टीम असते त्यामुळे देशातील वातावरण रोज कसे बदलते हे त्यांना कळत असते. प्रत्यक्ष मतदान सुरू असताना हे लोक प्रतिक्रिया गोळा करत असतात.यांचा सॅम्पल साइज हा खूप मोठा असतो आणि म्हणून त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त असते.

प्रत्येक एजन्सीला मिळणाऱ्या यशाचे प्रमाण साधारण ५०% ते ७०असते. शंभर टक्के यशाची खात्री कोणीही देत नाही.तशी कोणतीही एजन्सी अस्तित्वात नाही.

 पिंजऱ्यातून बाहेर येऊन पोपट चिठ्ठी काढतो तसे हे पोल्स असतात असे काही लोक म्हणतात. तर काही लोक हवा कळते म्हणून पोल्स बघतात. तर काही चार घटकेची करमणूक म्हणून याकडे बघत असतात

सध्याचा ओपिनियन पोल्सचा कल बघता असे दिसून येते की एनडीएला २६० ते २८० जागा मिळणार असे सरासरी अंदाज आहेतप्रदीप भंडारी यांच्या जन की बात चा सर्व्हे  मात्र एनडीएला ३१० सीट्स मिळतील असे सांगतो.भंडारी यांनी गेल्या काही वर्षात तेरा निवडणुकांचे अंदाज अचूक वर्तवले होते. ट्विटरवर चिंतामणी म्हणून एक अकाऊंट आहे. त्याने २०१४ साली  निवडणुकीचा निकाल अचूक वर्तवला होता. त्याने कालच आपला अंदाज जाहीर केला असून त्यानुसार भाजपला २७१ तर एनडीए ला ३३५ सीट्स मिळतील.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी टक्क्यांनी वाढली होती आणि मतदारांची संख्या १३ कोटींनी. यामुळे मोदींचे स्पष्ट बहुमत चकित करून गेले. त्याचा अंदाज फार लोकांना आला नव्हता.

यंदा मतदारांच्या संख्येत कोटींची वाढ झालेली आहे आणि जर मतदानाची टक्केवारी ७०% च्या  वर गेली  तर पुन्हा हे सगळे अंदाज धुळीस मिळून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले दिसेल

जर भाजपला स्वतःला स्पष्ट बहुमत मिळवायचे असेल तर प्रत्येक बूथ प्रमुखाने त्यांच्या बूथवर ८०% मतदान होईल  असे प्रयत्न केले तर मोठा विजय निश्चित आहे

सर्व्हेमधून भाजप आणि एनडीएच्या दिशेने वातावरण आहे हा ट्रेंड ट्रॅक झाला आहेप्रत्यक्ष मतांमध्ये तो परिवर्तित करून यश मिळवणे हे महत्वाचे काम मतदानाच्या दिवशी करायचे बाकी आहे.

मोदींच्या मुकुटात जर पुन्हाहिराबसवायचा असेल तर यापन्नाप्रमुखांनी जोरदार काम केले पाहिजे.

आनंद विश्वनाथन

११/०४/२०१९

Share This
 •  
 • 203
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  203
  Shares

Leave a Reply

MENU