fbpx
Jul 4, 2019
332 Views
0 0

सावित्री नदीवरील पूल…

Written by

लोकांना खरे तर अपघात झाल्यानंतर अशा घोषणा ऐकण्याची सवय झाली आहे. त्यामुळे कोणालाच ह्या पुलाचे काम खरेच सुरु होईल व तो कधी पूर्ण होईल ह्या बद्दल अंदाज नव्हता. पण लोकांच्या अपेक्षेपेक्षा जलद गतीने नव्या पुलासंबंधीचे निर्णय पूर्ण होत काही महिन्यांतच कामाला सुरुवात झाली.

Share This
 •  
 • 506
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  506
  Shares

दोन ऑगस्ट २०१६ रोजी मध्यरात्री महाडजवळच्या राजेवाडीफाट्या जवळ असलेला ब्रिटीशकालीन पूल पडला. दोन एस.टी.बस गाड्या, खाजगी मोटारी अशा वाहनांना भर अंधारात जलसमाधी मिळाली. सुमारे ४० जणांनी ह्या दुर्दैवी अपघातात जीव गमावला.  

ह्या अपघाता नंतर केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ नवीन पुलाच्या बांधणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. लोकांना खरे तर अपघात झाल्यानंतर अशा घोषणा ऐकण्याची सवय झाली आहे. त्यामुळे कोणालाच ह्या पुलाचे काम खरेच सुरु होईल तो कधी पूर्ण होईल ह्या बद्दल अंदाज नव्हता. पण लोकांच्या अपेक्षेपेक्षा जलद गतीने नव्या पुलासंबंधीचे निर्णय पूर्ण होत काही महिन्यांतच कामाला सुरुवात झाली

अशा प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणी बद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ख्याती आहे. त्यांनी घोषणा केल्या प्रमाणे एक वर्षाच्या आत, म्हणजे दोन ऑगस्ट २०१७ च्या आत नवा पूल बांधून पूर्ण झाला. प्रत्यक्ष पुलाचे बांधकाम सुरु केल्यापासून १८० दिवसांत ते पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात वीस दिवस आधीच ते काम पूर्ण झाले. सुमारे २४० मीटर लांबीच्या ह्या पुलाला ३५ कोटी रुपये खर्च आला. आधीच्या पुलापेक्षा ह्याची उंची वाढवण्यात आली असल्याने ऐन पावसाळ्यात वा पूरजन्य परिस्थितीतही हा पूल सुरक्षित पणे वापरता येऊ शकेल. पूर्वीच्या पुलापेक्षा ह्या पुलाची रुंदीही नव्या मानकानुसार केले असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहनांची रहदारी अधिक सुलभतेने सुरु राहील

ह्याच बरोबरीने मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही वेगाने सुरु असून २०२० पर्यंत ते कामही पूर्ण होईल आणि मुंबईगोवा रस्त्यावरून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना, विशेषत: कोकणात प्रवास करणाऱ्यांना अधिक सुखकारक वेगवान प्रवास करता येईल अशी आशा आहे.

Share This
 •  
 • 506
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  506
  Shares
Article Categories:
Uncategorized

Leave a Reply

MENU