fbpx
Jun 15, 2019
267 Views
0 0

याला लोकशाही ऐसें नाव

Written by

अनेक ठिकाणच्या प्रचारादरम्यान हे समोर आले आहे. मावळ मतदारसंघातील पार्थ पवार चा पराभव हा जसा त्याच्या कर्तृत्वशून्यतेमुळे झाला तसाच तो कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळे देखील झाला आहे. हेच चित्र राजस्थान मध्ये वैभव गेहलोत च्या विषयात पाहायला भेटले आहे. घराण्याचे नाव घेऊन ‘आयत्या बिळावर नागोबा’ होणे हे आताच्या काळात वाटते तितके सोप्पे नाही हेच सध्याच्या परिस्थितीने सिद्ध केले आहे.

Share This
 •  
 • 180
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  180
  Shares

भारत हा लोकशाही प्रधान देशआहे. या देशात कोणीही जो या देशाचा नागरिक आहे तो देशाचा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकतो. देशाचा पंतप्रधानच नाही तर देशाच्या लोकशाही प्रक्रियेत ज्या म्हणून कोणत्या निवडणुका आहेत त्या निवडणूक प्रक्रियेत तो भाग घेऊ शकतो. कुठलीही पार्श्वभूमी नसलेले अनेक असे आहेत जे या देशाच्या राजकारणात उत्तम योगदान देऊन गेले आहेत. स्वतः च्या जीवावर सर्व मेहेनत करून समाजासाठी काहीतरी चांगले करावे या इच्छेने अनेक व्यक्तींनी राजकारणात आपले जीवन खर्ची घातले या मांदियाळीत सरदार वल्लभ भाई पटेल, लाल बहादूर शास्त्री, श्यामप्रसाद मुखर्जी, पं .दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांची नावे आवर्जून घेता येतील. असे अनेक नेते भारताच्या लोकशाहीने  आपल्याला दिले आहेत.

वर लिहिलेले सर्व खरे असले तरी  भारताच्या राजकारणावर अजूनही काही मोजक्या परिवारांचे वर्चस्व पाहावयास मिळते. जसजसा काळ पुढे सरकत चालला आहे तसतसे त्या घराण्यांचा सूर्य देखील अस्ताला जाताना दिसत आहे. मागील लेखात काही मोठ्या घराण्यातील अत्यंत महत्वाच्या व्यक्ती त्यांच्या नेहमीच्या मतदारसंघातून सपशेल कश्या  हरल्या याची कारणमीमांसा केलेली आपल्या वाचनात आली असेलच. केवळ मोठे नाव आहे आणि एखाद्याचे पूर्वज राजकारणात होते म्हणून कोणी त्याच घराण्यातील व्यक्ती पुढे येणे याला लोकशाही नाही तर घराणेशाही म्हणतात हे आता जनतेला समजले आहे. जनता आता सकारात्मक निर्णयांची आस लावून बसलेली असते आणि जी व्यक्ती त्यांना परिणामकारक वाटते त्यांना जनता निवडून देत आहे हे  आपण यावेळी पाहिले. दिल्ली पासून दक्षिणेपर्यंत जर निरीक्षण केले तर मोठमोठ्या उंचीवरील असलेले घराणे आणि त्यातील त्या घराण्याचा उत्तराधिकारी जनतेने मतदान करता हरवला आहे. मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्य सिंधिया, राजस्थान मधील वैभव गेहलोत, उत्तरप्रदेश मध्ये राहुल गांधी, महाराष्ट्रात पार्थ पवार या आणि अश्या अनेक घराणेशाहीतुन उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांना जनतेने धूळ चारली आहे

विविध राजकीय पक्ष हे वेळोवेळच्या  परिस्थितीला सामोरे ठेवून संघटनात्मक कार्य करत असतात आणि त्या कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी अविरत झटणारा कार्यकर्त्यांचा समूह प्रत्येक पक्षामध्ये असतो. कार्यकर्ता म्हणून संघटनेसाठी झटून केलेलं कार्य आणि त्याचे श्रेय घेऊन जाणारा कोणीतरी वेगळाच दिसला कि कार्यकर्त्यांचे अधिष्ठान हलायला सुरुवात होते आणि समाजप्रमाणेच कार्यकर्ता देखील घराण्याचे नाव घेऊन आलेल्या उमेदवाराला मदत करण्यास धजत नाही. अनेक ठिकाणच्या प्रचारादरम्यान हे समोर आले आहे. मावळ मतदारसंघातील पार्थ पवार चा पराभव हा जसा त्याच्या कर्तृत्वशून्यतेमुळे झाला तसाच तो कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळे देखील झाला आहे. हेच चित्र राजस्थान मध्ये वैभव गेहलोत च्या विषयात पाहायला भेटले आहे. घराण्याचे नाव घेऊनआयत्या बिळावर नागोबाहोणे हे आताच्या काळात वाटते तितके सोप्पे नाही हेच सध्याच्या परिस्थितीने सिद्ध केले आहे

घराण्यांचे नाव घेऊन वर्षानुवर्षे सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवू पाहणाऱ्या व्यक्ती आणि घराणे नंतरच्या काळात अत्यंत मोठ्या भ्रष्टाचाराचा आणि आर्थिक अनागोंदीचा भाग झालेले दिसले आहेत. मतदारसंघातील मतदारांना सदैव विविध संवेदनशील विषयांमध्ये गुंतवून ठेवणे आणि त्याचा उपयोग करून घराण्याची अपरिहार्यता निर्माण करण्याचे कार्य अनेक वर्षे विविध तथाकथित घराण्यांनी केले परंतु सर्वच जण भ्रष्टाचारामध्ये लिप्त झाले आणि आणि जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास हळू हळू ओसरत चालला आहे. येणाऱ्या काळात निश्चित विचार आणि दिशा घेऊन कार्य करणाऱ्या व्यक्तीलाच समाज डोक्यावर उचलेल हेच २०१९ निवडणुकीत पुनः सिद्ध झाले आहे.

D.Yadunath

Share This
 •  
 • 180
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  180
  Shares

Leave a Reply

MENU