fbpx
Jul 11, 2019
306 Views
0 0

विकासाची वॉर रूम

Written by

जी प्रोजेक्ट्स अक्षरशः खितपत पडली होती त्यांना संजीवनी देण्याचे महत्त्वाचे काम या वॉर रूमने केले आहे. एक प्रोजेक्ट घेऊन त्यामध्ये छोटी छोटी सब प्रोजेक्ट्स आयडेंटिफाय केली गेली.त्या प्रत्येक सबप्रोजेक्टकडे व्यवस्थित लक्ष पुरवले गेले आणि ते कसे मार्गी लागेल यासाठी विचार केला गेला. ज्या ज्या परवानग्या लागतात त्या त्या त्वरेने मिळतील यासाठी प्रयत्न केले गेले.

Share This
 •  
 • 351
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  351
  Shares

भाजप आणि विकास यांचे अतूट नाते आहे. जिथे जिथे भाजप सत्तेवर येते त्या त्या राज्यांमध्ये सर्वांगीण विकास साधण्याला अग्रक्रम दिला जातो.मग ते केंद्र सरकार असो वा कोणतेही राज्य सरकार. ऑक्टोबर २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले.राज्याला ताज्या दमाचे, तरुण, तडफदार नेतृत्व लाभले. राज्याचा सर्वांगीण विकास मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चर या विषयाला साहजिकच प्राथमिकता दिली गेली. हेतू चांगला असेल आणि तत्परतेने कार्यवाही झाली नाही तर परिणाम शून्य असतो. देवेंद्र फडणवीस सरकारने अतिशय सकारात्मक पावले टाकली.

सर्वप्रथम त्यांनी एक स्वतंत्र वॉररूम तयार केली.या वॉर रूम चा कारभार कार्यक्षम, अनुभवी सनदी अधिकारी आणि सरकार बाहेरचे टॅलेंट म्हणजेच ओएसडी ( ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी ) यांच्या संयुक्त टीमकडे सोपवला. त्याचे नेतृत्व स्वतः करायचे ठरवले. दक्षिण मुंबईतील केवळ ४५० स्क्वेअर फूट कार्यालयात ऑफिस थाटण्यात आले.

मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात अशी अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट होती जी वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक वर्षे अडकली होती. वेगवेगळ्या एजन्सीजचे पाय एकमेकांत अडकले होते. ताळमेळ नीट साधता आल्यामुळे ती प्रोजेक्ट रखडली होती. त्यांच्या कार्यामध्ये सुसुत्रता आणणे हे मुख्य उद्देश होते.

या वॉर रुमचे तीन विभाग केले गेले होते.प्रत्येकाला काम वाटून दिले होते. मुंबई महापालिका, एमएमआरडीए आणि  रेल्वे या तीन महत्वाच्या संस्थांशी संपर्क ठेवण्यासाठी ही विभागणी होती.याचा परिणाम असा झाला की या वॉररूमने लवकरच आपली कार्यक्षमता दाखवून दिली. राज्यातील अनेक इन्फ्रास्ट्रक्चर पप्रोजेक्ट्सवर चोवीस तास नजर ठेवली जाऊ लागली,जाब विचारले जाऊ लागले, अडचणी दूर करण्यात आल्या.

सर्व महत्त्वाकांक्षी योजना उदाहरणार्थ मुंबईतील कोस्टल रोड,सर्व मेट्रो प्रोजेक्ट्स, समृद्धी महामार्ग ,मोठी इरिगेशन प्रोजेक्ट्स आणि महत्वाचे राज्य महामार्ग असे टार्गेट होते.

जी प्रोजेक्ट्स अक्षरशः खितपत पडली होती त्यांना संजीवनी देण्याचे महत्त्वाचे काम या वॉर रूमने केले आहे. एक प्रोजेक्ट घेऊन त्यामध्ये छोटी छोटी सब प्रोजेक्ट्स  आयडेंटिफाय केली गेली.त्या प्रत्येक सबप्रोजेक्टकडे व्यवस्थित लक्ष पुरवले गेले आणि ते कसे मार्गी लागेल यासाठी विचार केला गेला. ज्या ज्या परवानग्या लागतात त्या त्या त्वरेने मिळतील यासाठी प्रयत्न केले गेले.

कांदिवली ते नरिमन पॉईंट  कोस्टल रोड २०११ पासून अडकला होता.कुलाबा ते सिपझ हा मोठा संपूर्णपणे अंडर ग्राऊंड मेट्रो मार्ग मृतावस्थेत पडला होता. देवेंद्र फडणवीस सरकारच्या वॉररूमने त्यात खूप मोठी प्रगती केली. आज या मेट्रो मार्गाची प्रगती जर आपण बघाल तर अक्षरशः थक्क व्हाल

याचे मोठे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते.प्रत्येक मीटिंगमध्ये स्वतः हजर असतात, कामाचा आढावा घेतात, सूचना देतात आणि अडचणी दूर करण्यासाठी निर्णय घेतात.या प्रोजेक्ट्सशी संबंधित सर्व खात्यांचे प्रमुख या मीटिंग्जना हजर असतात. त्यामुळे कॉर्डिनेशन सहज होते.

महाराष्ट्राचा विकास पुरुष म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव नक्की घेतले जाईल.

आनंद विश्वनाथन

Share This
 •  
 • 351
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  351
  Shares

Leave a Reply

MENU